Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

By शर्वरी जोशी | Published: September 25, 2021 10:35 AM2021-09-25T10:35:41+5:302021-09-25T10:51:51+5:30

Bhagyshree mote:अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर 'मृत्युंजय मंत्र' असलेला टॅटू गोंदवून घेतला. या टॅटूचे काही फोटो, व्हिडीओदेखील तिने तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते.

marathi actress bhagyshree mote reply to trolls after shared photo on mahamrityunjay mantra tattoo | Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्दे'हा टॅटू काढण्याचा माझा शुद्ध हेतू होता.'


'काय रे रास्कला', 'माझ्या बायकोचा प्रियकर' अशा अनेक  मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. आपल्या अभिनयकौशल्यामुळे भाग्यश्री कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येत आहे. अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर 'मृत्युंजय मंत्र' असलेला टॅटू गोंदवून घेतला. या टॅटूचे काही फोटो, व्हिडीओदेखील तिने तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. मात्र, हा टॅटू पाहून नेटकऱ्यांनी तिला संमिश्र प्रतिक्रिया दिली. यात काही जणांनी धार्मिक भावना दुखावल्याचे आरोपदेखील केले. या सगळ्या आरोपांवर भाग्यश्रीने मौन सोडलं असून हा टॅटू तिने नेमका कोणत्या हेतूने काढला यामागचं कारण सांगितलं आहे.

मृत्युंजय मंत्राचा टॅटू काढल्यानंतर ट्रोल झालेल्या भाग्यश्री मोटेने अलिकडेच 'लोकमत ऑनलाइन'ला प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये "हा टॅटू काढण्याचा माझा शुद्ध हेतू होता. त्यातून कोणाला दुखावण्याचा हेतू अजिबात नव्हता", असं तिने सांगितलं आहे.

"भगवान शंकरावर म्हणजेच महादेवावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळेच त्या भक्तीमुळे मी मृत्युंजय मंत्राचा टॅटू काढण्याचा निर्णय घेतला होता. तसंच हा टॅटू काढण्यासाठी शरीरावरील ती जागा निवडण्यामागेही एक कारण आहे. मी हा टॅटू मुद्दाम कोणाला दाखवण्यासाठी केला नाही", असं भाग्यश्री म्हणाली.

पुढे ती म्हणते, "सामान्य व्यक्ती असण्यासोबतच मी एक अभिनेत्री आहे. त्यामुळे अनेकदा शरीराच्या इतर भागावर टॅटू काढल्यानंतर त्याचा शूटदरम्यान प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच, मी टॅटूसाठी ही जागा निवडली ज्यामुळे तो शूटदरम्यान कव्हरअप होऊ शकतो. तसंच तुम्ही तुमच्या कोणत्याही बॉडी पार्टला हिणवू शकत नाही. शरीरावरील हा भाग टॅटूसाठी योग्य आणि तो भाग अयोग्य असं आपण नाही म्हणू शकतं. त्यामुळे मी हा टॅटू कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी काढलेला नाही. तर तो माझ्या श्रद्धेचा भाग म्हणून काढला आहे."

भाग्यश्री मोटेने नको त्या ठिकाणी गोंदवला 'महामृत्युंजय मंत्र'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नेमकं काय आहे प्रकरण?

अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या किंचितसं वर महामृत्युंजय मंत्र गोंदवून घेतला. भाग्यश्रीचा हा पहिलाच टॅटू असल्यामुळे तिने तो जाहत्यांसोबत शेअरदेखील केला होता. मात्र, अनेकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

 कोण आहे भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने  'काय रे रास्कला', 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही ती झळकली आहे. 
 

Web Title: marathi actress bhagyshree mote reply to trolls after shared photo on mahamrityunjay mantra tattoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app