Join us

आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फॅशन-फिटनेस मंत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 13:58 IST

आजही अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते.

बॉलिवूड फिल्म इडंस्ट्रीमध्ये अनेक असा सेलिब्रिटी आहेत, ज्या आपल्या अभिनयासोबतच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. या यादीमध्ये अनुष्का शर्माचाही समावेश होतो. अनुष्का शर्माबॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचीही खूप चर्चा होते. दोन मुलांची आई असूनही अनुष्का तंदुरुस्त आणि निरोगी आहे. तर आज आपण जाणून घेऊया अनुष्का स्वतःला इतकी फिट कशी ठेवते.

आजही अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. अनुष्काचे तंदुरुस्त राहण्याचे रहस्य म्हणजे ती भरपूर व्यायाम करते. अनुष्का तिच्या प्रेग्नेंसी काळातसुद्धा विविध योगा पोज देताना दिसली होती. प्रेग्नेंसीदरम्यान तिनं अनेकदा योगा करतानाचे फोटो शेअर केले होते.  याशिवाय ती तिच्या आहाराशी अजिबात तडजोड करत नाही. योगा व्यतिरिक्त अनुष्का शर्मा तिच्या आहारात पोषण आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असे पदार्थ ठेवते. अभिनेत्रीच्या आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ असतात.  ज्यामुळे संपूर्ण शरीराला पोषक तत्व मिळण्यास मदत होते. 

चमकदार त्वचेचे आणि तंदुरुस्त शरीराचे रहस्य पाणी. ती भरपूर पाणी पिते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि मेटाबॉलिज्म रेटही वाढतो. जे वजन नियंत्रणात राखण्यासही मदत करते.ती संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करते आणि जंक फूड खाणे टाळते.  अनुष्का रुटीन फॉलो करते आणि तिचं वर्कआऊट, व्यायाम कधीच मिस करत नाही. त्यामुळे तिचे फिजिक मेंटेन आहे. फिटनेस आणि सौंदर्य काय राखण्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा तिाचा प्रयत्न असतो.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. पहिल्या मुलीनंतर अनुष्का आता एका मुलाची आई बनली आहे. आई होणं हा जितका आनंदाचा क्षण आहे, तितकीच ती एक जबाबदारी आहे. याकाळात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. पण दोन मुलांची आई असलेली अनुष्का याला अपवाद आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मासेलिब्रिटीबॉलिवूडफिटनेस टिप्स