Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूड स्टार विल स्मिथने दिलजीत दोसांझसोबत केला भांगडा, व्हिडीओने जिंकलं भारतीयांचं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 11:28 IST

हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथ आणि दिलजीत दोसांझ यांचा भांगडा करनाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय (will smith, diljit dosanjh)

पंजाबी गायक आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता दिलजीत दोसांझ (diljit dosanjh) हा सर्वांचा लाडका कलाकार. दिलजीतची गाणी आणि त्याचा अभिनय अशा दोन्ही गोष्टी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. दिलजीत सध्या त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टनिमित्त जगभरात भ्रमंती करत असतो. दिलजीतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिलजीत हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथसोबत (will smith) भांगडा करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांचं मन जिंकलंय

दिलजीत-विलचा डान्स व्हायरल

दिलजीत आणि विल स्मिथ यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना कोलॅब करुन डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दिलजीतच्या डान्स स्टेपला विल स्मिथ कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय. या व्हिडीओखाली दिलजीतने कॅप्शन लिहिलंय की, "पंजाबी आ गया ओए. दिग्गज कलाकार विल स्मिथ सोबत केला डान्स. किंग असलेल्या विल स्मिथला भांगडा करताना पाहून आणि पंजाबी ढोलच्या तालावर स्टेप करताना पाहणं प्रेरणादायी आहे", अशा शब्दात दिलजीतने विल स्मिथच्या नृत्याचं कौतुक केलं. या दोघांचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

दिलजीतचं वर्कफ्रंट

दिलजीत दोसांजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'जट्ट एंड जूलियट 3' या सिनेमात तो शेवटचा आपल्याला दिसला. २०२४  साली रिलीज झालेल्या या पंजाबी कॉमेडी सिनेमात दिलजीतसोबत नीरु बाजवा झळकली. याशिवाय २०२४ मध्येच रिलीज झालेल्या अमर सिंग चमकिला सिनेमात दिलजीतने प्रमुख भूमिका साकारली. हा सिनेमा चांगलाच नावाजला गेला. याशिवाय दिलजीतच्या अभिनयाचंही चांगलं कौतुक झालं अन् त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. दिलजीतच्या आगामी प्रोजेक्टची सर्वांना उत्सुकता आहे. 

टॅग्स :दिलजीत दोसांझहॉलिवूडबॉलिवूड