Join us
Daily Top 2Weekly Top 5

"डॉक्टरकडे जाण्यासाठी पैशांची गरज..."; ८६ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्याची भावुक कहाणी, मराठी सिनेमातही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 10:57 IST

बॉलिवूडमध्ये काम करुन, प्रसिद्धी मिळवून एक असा अभिनेता आहे जो वयाच्या ८६ व्या वर्षीही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. वयानुसार डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा अभिनेता आजही काम करतोय

बॉलिवूडमध्ये काम करुन, प्रसिद्धी मिळवून एक असा अभिनेता आहे जो वयाच्या ८६ व्या वर्षीही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. वयानुसार डॉक्टरांकडे जाण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा अभिनेता आजही काम करतोय. त्यांचं नाव आहे दिनेश हिंगू. 'हेराफेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या सिनेमांमधून चर्चेत आलेले दिनेश आर्थिक समस्यांमुळे आजही अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत दिनेश यांनी हा खुलासा केला आहे.एका मुलाखतीत दिनेश म्हणाले, ''मी आता ८६ वर्षांचा आहे. मी कधीकधी काम करण्यासाठी घराबाहेर पडतो. मी नुकतंच पडलो त्यामुळे मला दुखापत झाली. म्हणूनच डॉक्टरांकडे जाण्यासाठी मला पैशांची गरज आहे. डॉक्टर कधी ५००० रुपये मागतात तर कधी ६०००. दिग्दर्शक आणि कलाकारांना इतके पैसे मिळत नाहीत. मी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमध्येही काम केलं आहे. याशिवाय गुजराती आणि राजस्थानी सिनेमांमध्येही काम केलंय.'', अशाप्रकारे दिनेश हिंगू यांनी त्यांची करुण कहाणी सर्वांना सांगितली. 

दिनेश हिंगू यांनी आयुष्याची व्यथा मांडल्याने त्यांचे चाहते भावुक झाले आहेत. दिनेश यांनी ३०० हून जास्त सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. परंतु आजही मेडिकलचा खर्च भागवण्याची चिंता त्यांना सतावत असते. जे अभिनेते सिनेमात छोट्या भूमिका साकारतात त्यांचं आयुष्य किती अनिश्चित आहे, हेच यातून दिसून येतं. दिनेश यांनी 'हेराफेरी' आणि 'फिर हेरा फेरी' मध्ये काम करुन चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यांनी कधीच मोठी भूमिका करण्याचा अट्टहास केला नाही. परंतु आज वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांना काम करावं लागत आहे. त्यांनी 'नशीबाची ऐशी तैशी' या मराठी सिनेमातही काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dinesh Hingu, 86, of 'Hera Pheri' fame, needs money for treatment.

Web Summary : Veteran actor Dinesh Hingu, known for 'Hera Pheri,' continues acting at 86 due to financial constraints. He needs money for medical expenses, revealing the struggles faced by many supporting actors despite fame. He has also worked in Marathi films.
टॅग्स :बॉलिवूडमराठी चित्रपटमराठी अभिनेता