Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hema Malini : चाहतीने खांद्यावर हात ठेवला म्हणून चिडल्या हेमा मालिनी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:09 IST

अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार हेमा मालिनी याचा दबदबा जगभरात पाहायला मिळतो. हेमा मालिनी यांच्या चाहत्यांची संख्या भारतात नाहीतर, सातासमुद्रा पार देखील आहे. ड्रिम गर्लची एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते गर्दी करतात. आता देखील असंच काही झालं आहे. त्यांच्या एका व्हिडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

हेमा मालिनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत पोहोचल्या होत्या. यावेळी हेमा मालिनी याच्या भोवती चाहत्यांची गर्दी जमली. व्हिडीओमध्ये दिसते आहे की  एका चाहती  हेमा मालिनीसोबत फोटो काढत आहेत. त्या चाहतीने हेमा मालिनी यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि ही गोष्ट अभिनेत्रीला अजिबात आवडली नाही. हेमा यांनी तातडीने त्या चाहतीला हात खांद्यावरुन काढायला लावला. हेमा मालिनी 'हाथ नही, हाथ नही', असं बोलल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकू येते आहे. 

हेमा मालिनी  यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 'म्हातारपणी अशी चिडचीड वाढते', 'हेमा मालिनी यांचं हे वाईट वर्तन आहे', 'ऑनस्क्रिन फक्त दिखावा करताता', म्ही निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरी जाऊन मत का मागता?',  'लोक त्यांना खूप आदर देतात आणि ते स्वतःला देव मानू लागतात', अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.  

टॅग्स :हेमा मालिनीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया