Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र-शबाना आजमी यांचा 'तो' किसींग सीन, हेमा मालिनी म्हणाल्या, "मी धरमजींसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 15:29 IST

नुकत्याच एका पत्रकार परिषदेत त्यांना धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनवर प्रश्न विचारण्यात आला.

करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमात रणवीर सिंग आणि आलियापेक्षा धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आजमी (Shabana Azmi) यांच्या किसींग सीनचीच जास्त चर्चा आहे. सिनेमात या दोन्ही दिग्गज कलाकारांची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.तर आता या गाजत असलेल्या सीनवर अभिनेत्री हेमा मालिनी यांचीही प्रतिक्रिया चर्चेत आहे.  हेमा मालिनी यांचा भाऊ आर. के. चक्रवर्ती यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानिमित्त अभिनेत्रीने नवी दिल्लीत हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना धर्मेंद्र आणि शबाना यांच्या किसींग सीनवर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या,'मी अजून तो सिनेमा पाहिलेला नाही. पण मी धरमजींसाठी खूप खूश आहे. त्यांना नेहमीच कॅमेऱ्यासमोर राहायला आवडतं. त्यांचं कामावर खूप प्रेम आहे. घरी असतानाही ते बऱ्याचदा मला जुने व्हिडिओ दाखवत मी कसा दिसतोय असं विचारत असतात.'

कालच धर्मेंद्र यांनी हा किसींग तर 'बाएँ हात का खेल' अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर सगळ्यांनाच हसू आलं होतं. तर धर्मेंद्र यांना कोणाला किस करायला आवडणार नाही असं शबाना आजमी म्हणाल्या होत्या. सिनेमाने एका आठवड्यात 70 कोटींचा गल्ला पार केला आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. पुन्हा तो 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' सारख्या सिनेमांचा काळ परत आला असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांमधून उमटत आहे.

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्रशबाना आझमीबॉलिवूड