Harshvardhan Rane: बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे 'Harshvardhan Rane' त्याच्या आगामी एक दीवाने की दीवानियत' या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' नंतर हर्षवर्धन राणे इंडस्ट्रीतून गायब झाला होता. आता बऱ्याच कालावधीनंतर तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतोय. सध्या तो एक दिवाने की दीवानियतच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. 'एक दीवाने की दीवानियत' सिनेमाच्या पार्टीमध्ये भयानक घटना घडली आहे. या पार्टीत हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे.
हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने की दीवानियत' च्या सेटवर अचानक हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. परंतु, यामुळे हर्षवर्धनचे चाहते चिंतेत आहेत. हर्षवर्धन राणेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिवाय भावुक नोट देखील लिहिली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, 'सनम तेरी कसम' नंतर हर्षवर्धन राणे पुन्हा 'एक दीवाने दीवानियत' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याची पाहायला मिळते आहे. 'एक दिवाने दिवानीयत' चे शेवटचं शूट चंदीगडमध्ये सुरू होतं. हे शूट पूर्ण झाल्यानंतर, चित्रपटाच्या टीमने केक कटिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये हेलियम गॅसचे फुगे देखील लावण्यात आले होते. त्यावेळी अचानक ते फुगे फुटल्याने आगीचा एकच भडका उडाला. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.