Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासूबाई खास..! कियारा आडवाणीच्या सासूबाईंना कधी पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:38 IST

Kiara Advani: सिद्धार्थची आई आणि कियारा यांच्यात छान बॉण्डिंग आहे.

उत्तम अभिनयशैली आणि गोड, लोभसवाणा चेहरा यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी (Kiara Advani). कबीर सिंग, शेरशाह यांसारख्या सिनेमातून कियाराने तिच्यातील अभिनयाची चुणूक दाखवली. काही काळापूर्वीच कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे. तेव्हापासून या जोडीची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगते.  परंतु, यावेळी तिच्या सासूबाईंची म्हणजेच सिद्धार्थच्या आईची चर्चा रंगली आहे.

'शेरशाह' या सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या सिद्धार्थ मल्होत्राची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. यात अलिकडेच त्याच्या पहिल्या कमाईची चर्चा सुरु झाली. एका चित्रपटासाठी ८ कोटी रुपये मानधन घेणाऱ्या सिद्धार्थची पहिली कमाई ७ हजार होती. ही रक्कम त्याने पहिल्यांदा त्याच्या आईच्या हातात दिली. तेव्हापासून त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या त्याच्या आईची चर्चा रंगली आहे.

एकेकाळी 'या' अभिनेत्याचं साधं बँक खातंही नव्हतं, तोच आज एका सिनेमासाठी घेतो 8 कोटी रुपये

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थने काही काळापूर्वी त्याच्या आईसोबतचा फोटो शेअर करत त्यांना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या होत्या.  रिम्मी मल्होत्रा असं त्याच्या आईचं नाव आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थची आई आणि कियारा यांच्यात छान बॉण्डिंग आहे. कियारा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वी त्याच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात सुनेचं स्वागत करण्यासाठी रिम्मी किती उत्साही आहेत हे दिसून येत होतं. 

टॅग्स :कियारा अडवाणीसिद्धार्थ मल्होत्रासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा