Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा अरबाजने मलाइकाबाबत केला होता 'हा' खुलासा, 'या' कारणाने तोडलं होतं नातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 12:45 IST

तशा तर अरबाज खानच्या जीवनात अनेक घटना घडल्या. पण सर्वात मोठी घटना म्हणजे त्याचा १८ वर्षांचा संसार मोडणं. अरबाज खानने १९९८ मध्ये मलाइका अरोरासोबत लग्न केले होते.

बॉलिवूड अभिनेता, डायरेक्टर आणि निर्माता अरबाज खान याचा आज वाढदिवस. आज तो ५३ वर्षांचा झालाय. अरबाज अनेक सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून दिसलाय. त्याने १९९६ मध्ये आलेल्या 'दरार' सिनेमातून पदार्पण केलं होतं. या सिनेमात त्याने निगेटिव्ह भूमिका केली होती. आणि त्यासाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. चला जाणून घेऊ त्याच्याबाबत काही खास गोष्टी....

तशा तर अरबाज खानच्या जीवनात अनेक घटना घडल्या. पण सर्वात मोठी घटना म्हणजे त्याचा १८ वर्षांचा संसार मोडणं. अरबाज खानने १९९८ मध्ये मलाइका अरोरासोबत लग्न केले होते. २००२ मध्ये दोघांच्या मुलाचा जन्म झाला. पण १८ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. याचं कारणही दोघांनी सांगितलं होतं.

मलाइकाने सांगितलं होतं कारण....

करीना कपूरच्या चॅट शोमध्ये मलाइकाने सांगितले होते की, घटस्फोटामुळे तिला, अरबाजला आणि खान परिवाराला किती समस्यांचा सामना करावा लागला होता. मलाइका म्हणाली होती की, जेव्हा तुम्ही एखादं नातं मागे सोडून पुढे जाता तेव्हा कुणाला ना कुणाला यासाठी जबाबदार धरता. अनेकजण तुमच्याकडे बोट दाखवतात. हा माणसाचा स्वभाव आहे. जो बदलता येत नाही. आम्ही या नात्यापासून आनंदी नव्हतो. आम्ही एकमेकांना आनंदी ठेवू शकत नव्हतो. ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर वाईट परिणाम होत होता.

घटस्फोटाच्या एक रात्र आधी...

मलाइकाने शोमध्ये सांगितले होते की, घटस्फोटाच्या एक रात्रीआधी परिवाराने तिला काय प्रश्न केला होता. 'तुला हे करायचंय का? तुला तुझ्या निर्णयावर १०० टक्के विश्वास आहे का?. मलाइकाने सांगितले की, तिला हेच विचारलं जात होतं. ती म्हणाली होती की, जे लोक तुमची चिंता करतात ते तुम्हाला या गोष्टी विचारतातच.

अरबाजने केला होता धक्कादायक खुलासा

अरबाज घटस्फोटाबाबत म्हणाला होता की, गोष्टी आता अशा वळणावर आल्या आहेत की, यावर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मार्ग काढायचा होता. मी बिघडलेल्या गोष्टी सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला ते जमलं नाही. माझा मुलगा त्यावेळी १२ वर्षांचा होता आणि त्याला गोष्टी समजू लागल्या होत्या. त्याला कळत होतं काय होत आहे. मी नेहमीच माझ्या मुलाच्या सोबत आहे. मलाइकाला माझ्या मुलाची कस्टडी मिळाली आहे आणि मला यासाठी भांडायचं नव्हतं. कारण तो लहान होता आणि त्याला आईची गरज होती.

हे पण वाचा :

'या' अभिनेत्रीला सिनेमात बोल्ड सीन दिल्यामुळे घरच्यांनी धक्के मारत काढले होते घराबाहेर….

कमालीच्या सुंदर आहेत या साऊथ सुपरस्टार्सच्या बायका, यापूर्वी पाहिले नसतील हे फोटो

मिनिषा लांबाचा घटस्फोट; दोन वर्षांआधी पतीपासून झाली होती वेगळी, आत्ताकुठे केले कन्फर्म

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोराबॉलिवूड