प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमाशी संबंधित त्याचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये गोविंदाच्या बॉडीगार्डने पापाराझींसोबत गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये गोविंदाची अवस्था पाहून चाहते थक्क झाले आहेत.
गोविंदाची अवस्था पाहून चाहते हैराण
व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये गोविंदाचा पुढचा एक दात तुटलेला दिसत आहे. तो जेव्हा हसतो, तेव्हा त्याचा हा तुटलेला दात स्पष्टपणे नजरेस पडतो. एका बाजूला काही चाहत्यांनी हे वाढत्या वयाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. परंतु एकेकाळी बॉलिवूडमधील दिलखुलास, प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या गोविंदाची अशी अवस्था पाहून चाहत्यांना चांगलंच वाईट वाटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी गोविंदाला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.
गोविंदाचे आगामी चित्रपट
गोविंदा लवकरच काही मोठ्या चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तो सलमान खानच्या आगामी 'मातृभूमी' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. जरी निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी सलमान खानने स्वतः 'बिग बॉस १९' च्या मंचावर स्पष्ट केले होते की, तो गोविंदासोबत एका नवीन चित्रपटात काम करत आहे.
Web Summary : Govinda's recent appearance at an event has sparked concern among fans. A viral video shows the actor with a missing tooth, leading to discussions about aging. While some acknowledge it's natural, many express sadness seeing the once-vibrant star in this condition. He may appear in Salman Khan's 'Matrubhoomi'.
Web Summary : गोविंदा की हालिया उपस्थिति ने प्रशंसकों के बीच चिंता पैदा कर दी है। एक वायरल वीडियो में अभिनेता का एक दांत गायब दिख रहा है, जिससे उम्र बढ़ने को लेकर चर्चा हो रही है। कुछ लोग इसे स्वाभाविक मानते हैं, लेकिन कई लोग कभी जीवंत रहे सितारे को इस हाल में देखकर दुखी हैं। वह सलमान खान की 'मातृभूमि' में दिख सकते हैं।