Join us

"गोविंदाकडून घटस्फोट नाही...", मॅनेरजचा खुलासा; अभिनेत्याच्या पत्नीबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:10 IST

कुटुंबातील काही सदस्य मुलाखतींमध्ये बरंच बोलले त्यामुळेच...मॅनेजरचा रोख कुणाकडे?

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता अहुजा (Sunita Ahuja) लग्नानंतर ३८ वर्षांनी घटस्फोट घेणार अशा चर्चा कालपासून सुरु आहेत. तसंच दोघंही वेगळे राहतात आणि सुनिताने गोविंदालाघटस्फोटाची नोटीस पाठवली आहे असंही बोललं जात आहे. पण यात नक्की किती तथ्य आहे हे अजून समोर  आलेले नाही. गोविंदा किंवा सुनिताने अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. आता नुकतंच गोविंदाच्या मॅनेरजने या चर्चांवर काही खुलासे केले आहेत. 

सुनिता आहुजाने खरोखर कायदेशीर नोटीस पाठवली?

सोशल मीडियावर गोविंदा आणि पत्नी सुनिता विभक्त होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. माध्यमांमध्ये या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, गोविंदाचे मॅनेजर शशि सिन्हा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "कुटुंबातील काही सदस्यांनी मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यांवरुन या चर्चा सुरु झाल्या आहेत. यापेक्षा जास्त काही नाही. गोविंदा त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारित व्यस्त आहे. तो नियमित ऑफिसलाही येत आहे. काही गोष्टी आहेत ज्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच गोविंदाकडून घटस्फोटासाठी कोणतीच पावलं उचलली गेलेली नाहीत. पण हो, सुनिताकडून कायदेशीर नोटीस आलेली आहे. पण ही नोटीस नेमकी कशाबद्दल आहे याची मला कल्पना नाही. सुनिता गेल्या काही दिवसात मुलाखतींमध्ये गोविंदाबद्दल बरंच काही बोलली आहे. यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत."

ते पुढे म्हणाले, "दोघंही वेगवेगळ्या घरात राहतात याचा अर्थ ते विभक्त झालेत असा होत नाही. ते वेगळे राहत नाहीत. गोविंदा अनेकदा त्याच्या बंगल्यातच राहतो.  हो, तो त्याच्या दुसऱ्या घरी येत जात राहतो. काही दिवस बंगल्यात असतो. गोविंदा राजकारणातही आहे. त्याला तीही कामं असतात. मंत्रालयात जायचं असतं. सरकारशी संपर्क असतो. त्यामुळे काही काळ त्याने आपल्या बंगल्यात राहणं स्वाभाविकच आहे."

दरम्यान, सुनिता आहुजाने गोविंदाला नेमकी कोणती कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि त्यानंतर काय कारवाई झाली हे अजून गुलदस्त्यातच आहे. १९८७ साली गोविंदा आणि सुनिता लग्नबंधनात अडकले. त्यांना टीना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगाही आहे. 

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडघटस्फोट