अभिनेता गोविंदा घटस्फोट (govind rumours update) घेणार अशा चर्चा कालपासून सोशल मीडियावर सुरु झाल्या अन् सर्वांच्या भुवया उंचावल्या. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिताचा (sunita ahuja) ३७ वर्षांचा संसार मोडणार असल्याने सर्वांनाच धक्का बसला. या सर्व चर्चांवर गोविंदाच्या मॅनेजरनेही दुजोरा दिला. याबद्दल गोविंदाच्या कुटुंबाकडून मात्र अधिकृत स्टेटमेंट आलं नाही. अखेर गोविंदाचा भाचा आणि अभिनेता कृष्णा अभिषेक(krushna abhishek) आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह यांनी या सर्व चर्चांवर मौन सोडलं. काय म्हणाले?
कृष्णा अन् कश्मिरा मामाच्या घटस्फोटावर काय म्हणाले
न्यूज १८ शोशाला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा अभिषेकने मामा-मामी अर्थात गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटांच्या चर्चांवर भाष्य केलंय की, "असं होऊ शकत नाही. ते दोघं घटस्फोट घेऊ शकत नाही." याशिवाय कृष्णाची पत्नी कश्मिराने वक्तव्य केलंय की, "मला त्यांच्या (गोविंदा-सुनिता) वैयक्तिक आयुष्याविषयी जास्त काही माहिती नाही. परंतु मी एवढंच सांगू शकेन की या अफवा भयावह आहेत." याशिवाय गोविंदाची भाची आरती सिंहने या अफवांमध्ये कोणतंही तथ्य नाही असं सांगितलंय.
गोविंदाची भाची आरती सिंह म्हणाली की, "मी सध्या मुंबईत नसल्याने कोणाच्याही संपर्कात नाहीये. परंतु त्या दोघांचं नातं खूप स्ट्राँग आहे. लोकांना या खोट्या बातम्या कुठून मिळतात मला माहित नाही? दुसऱ्यांबद्दल अशा अफवा पसरवण्याआधी लोकांना आधी विचार केला पाहिजे. काही दिवसांपूर्वी माझ्याही घटस्फोटाची बातमी समोर आली होती. परंतु ती खोटी निघाली. अशा तथ्यहीन गॉसिप बातम्या फक्त तणाव निर्माण करण्याचं काम करतात." अशाप्रकारे गोविंदाच्या कुटुंबाने मौन सोडलंय. घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता यांच्या अधिकृत स्टेटमेंटची सर्वांना प्रतीक्षा आहे.