Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गो गोवा गॉन' सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:53 IST

Mukesh udeshi:ज्येष्ठ निर्माते मुकेश उदेशी यांचं ११ सप्टेंबर रोजी रात्री निधन झालं.

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातून सातत्याने दु:खद बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी रविंद्र महाजनी, सीमा देव यांसारख्या दिग्गज कलाकारांचं निधन झालं. त्यानंतर आता बॉलिवूडमधून वाईट बातमी समोर आली आहे. गो गोवा गॉन, द व्हिलनचे निर्माते मुकेश उदेशी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा कलाविश्वाला दु:खद धक्का बसला आहे.

ज्येष्ठ निर्माते मुकेश उदेशी यांचं ११ सप्टेंबर रोजी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती निर्माते आणि त्यांचे मित्र प्रवेश सिप्पी यांनी दिली. “ते चेन्नईमध्ये किडनी प्रत्यारोपणाची तयारी करत होते. तिथे अल्लू अरविंद त्यांची काळजी घेत होते. पण ऑपरेशनच्या काही दिवस आधी त्यांचे निधन झालं, असं प्रवेश सिप्पी यांनी सांगितलं.

दरम्यान, मुकेश यांचे गो गोवा गॉन, एक व्हिलन, कलकत्ता मेल असे अनेक सिनेमा गाजले. मुकेश उदेशी हे मॉरिशसमध्ये चित्रित झालेल्या बहुतेक बॉलिवूड चित्रपटांचे लाइन प्रोड्युसर देखील होते.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा