Join us
Daily Top 2Weekly Top 5

Khan Family Photoshoot : 'पठाण' फॅमिली! गौरी खानचं लेखन क्षेत्रात पदार्पण, कुटुंबासोबत केलं क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 16:04 IST

गौरी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्लासी पोज देताना दिसत आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे (Shahrukh Khan) जगभरात चाहते आहेत. त्याच्या 'पठाण' (Pathaan) सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची पत्नी गौरी खानची (Gauri Khan ) आहे. होय,  गौरी प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता तिने एक नवी इनिंग सुरु केलीये.  नुकताच गौरी खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गौरी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्लासी पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत गौरीने तिच्या कॉफी टेबल बुक लॉंच झाल्याची घोषणा केली आहे. 'माय लाईफ इन डिझाईन' या हे तिचं पहिलं पुस्तक बाजारात आलं आहे.

गौरी खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबाचा एक सुंदर फोटो शेअर केला. या फॅमिली फोटोत  शाहरुख खान, मुलगी सुहाना खान, मोठा मुलगा आर्यन खान आणि लहान मुलगा अबराम खान असे सगळेच झक्कास पोझ देताना दिसत आहेत.  शाहरुख, आर्यन आणि अबराम यांनी व्हाईट, ब्लू जीन्स आणि ब्राऊन रंगाचे जॅकेट घातले आहे.  तर सुहाना खान व्हाईट क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाच्या स्टायलिश पँटमध्ये दिसत आहे. गौरीने व्हाईट टॉप आणि काळ्या रंगाची स्किन टाईट पँट घातली आहे.

तर शाहरुखची पत्नी गौरी खानने आता लेखन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. गौरी तिच्या या नव्या इनिंगसाठी खूपच उत्सुक आहे. म्हणूनच तिने कुटुंबासोबत हे खास फोटोशूट केले आहे. गौरीची डिझायनिंग क्षेत्रातील आवड, तिचे अनुभव या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानगौरी खानसुहाना खानआर्यन खानअबराम खानपरिवारव्हायरल फोटोज्