Join us

"सलमानला फार भाई-भाई म्हणतो तू" पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर बिष्णोई गँगची फायरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 13:13 IST

इतकंच नाही तर लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक पोस्ट लिहित या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यातील वाद सध्या सगळीकडे चर्चेचा विषय आहे. बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने अभिनेत्याची सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली आहे. दरम्यान बिश्नोई गँगच्या आणखी एका कृत्याने लक्ष वेधलंय. नुकतंच त्यांनी पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या (Gippy Grewal) कॅनडातील बंगल्यावर फायरिंग केली आहे. इतकंच नाही तर लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक पोस्ट लिहित या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

काय आहे लॉरेन्स बिश्नोईची फेसबुक पोस्ट?

हा तर सत श्री अकाल, सगळ्यांना राम राम. आज व्हेंकुअर व्हाईट रॉक एरियामध्ये राहणाऱ्या गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर बिश्नोई ग्रुपने कारवाई केली आहे. सलमान खानला फारच भाई भाई करतो तू आता बोल भाई मला वाचव. आणि सलमान खानलाही हा मेसेज आहे की दाऊद तुझी मदत करेल हा तुझा भ्रम आहे. आमच्यापासून तुला कोणीच वाचवू शकत नाही. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर तू खूप ओव्हरअँक्टिंग केली. तुला सगळं माहित आहे की तो किती गर्विष्ठ होता, त्याचा कोणकोणत्या गुन्हेरांसोबत संपर्क होता.'

जोपर्यंत विक्की मिड्डूखेडा जीवंत होता तुम्ही पुढे मागे करत होतात. नंतर तुम्हाला सिद्धूबद्दल जास्तच वाईट वाटलं. तूही आता रडारवर आला आहेस आता दाखवतो तुला. हा तर ट्रेलर आहे फिल्म लवकरच रिलीज होईल. कोणत्याही देशात पळून जा पण लक्षात ठेव मृत्यूला कोणत्याही ठिकाणाचा व्हिसा घ्यावा लागत नाही. तो येतोच.'

गिप्पी ग्रेवालचा 'मौजा ही मौजा' हा कॉमेडी सिनेमा रिलीज होतोय. नुकतंच याचा ट्रेलर लाँच झाला. सलमान खाननेही गिप्पीच्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

टॅग्स :सलमान खानगुन्हेगारीकॅनडा