Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गंदी बात' फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठने केलं गुपचूप पद्धतीने लग्न; निकाहचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:00 IST

Gehana vashishtha: गेल्या काही काळापासून गेहना आण फैजान एकमेकांना डेट करत होते. मात्र, कधीही त्यांनी उघडपणे त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलं नव्हतं

आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे गेहना वशिष्ठ. 'गंदी बात'मुळे रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गेहनाने गुपचूप पद्धतीने लग्न केलं असून तिच्या निकाहचे फोटो आता समोर आले आहेत. गेहनाने अभिनेता, प्रियकर फैजान अन्सारी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. गेहना आणि फैजानच्या निकाहचे फोटो समोर आल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.

गेल्या काही काळापासून गेहना आण फैजान एकमेकांना डेट करत होते. मात्र, कधीही त्यांनी उघडपणे त्यांच्या नात्याविषयी भाष्य केलं नव्हतं. मात्र, निकाहचे फोटो शेअर करत त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेहना आणि फैजानने इस्लामिक रितीरिवाजानुसार लग्नगाठ बांधली आहे.

दरम्यान, निकाहच्या वेळी गेहनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर, फैजानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. सध्या या जोडीवर काहींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर, काही जणांनी त्यांच्यावर टीकास्त्रही डागलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमावेबसीरिज