Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फुकरे' ची हिरोईन आठवतेय का? बॉलिवूडमधून झाली गायब; आता कशी दिसते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 13:36 IST

'फुकरे' मध्या पुलकीत सम्राटसोबत तिची जोडी होती.

हिंदी सिनेमांमध्ये गेल्या काही वर्षात गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे २०१३ साली आलेला 'फुकरे' (Fukrey). पुलकीत सम्राट, अली फजल, वरुण शर्मा, मनज्योत सिंग आणि रिचा चड्डा यांनी सिनेमात धमाल केली होती. तरुणांनी या कॉमेडी सिनेमाला खूप प्रतिसाद दिला. पुढे याचे सीक्वेलही आले पण पहिला फुकरे सगळ्यांच्याच लक्षात राहिला. या सिनेमात पुलकीत सम्राटसोबत अभिनेत्री प्रिया आनंद (Priya Anand) झळकली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली. आता प्रिया आनंद कशी दिसते बघा

प्रिया आनंद मूळची चेन्नईची आहे. तिने अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलं आणि भारतात आल्यानंतर तिला मॉडेलिंगची ऑफर मिळाली.२०११ साली प्रियाने श्रीदेवी यांच्या 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात छोटी भूमिका साकारली होती. यानंतर ती'फुकरे' आणि 'फुकरे 2', 'रंगरेज' मध्येही झळकली. पण नंतर ती कुठेच दिसली नाही. सध्या प्रिया कुठे आहे आणि आता तिचा लूक किती बदलला आहे हे तिच्या लेटेस्ट पोस्टवरुन लक्षात येईल.

 प्रियाचे इन्स्टाग्रामवर १० लाख फॉलोअर्स आहेत. काही हिंदी सिनेमांमध्ये काम केल्यानंतर प्रिया साऊथ सिनेमांकडे वळली. तिने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. प्रिया सध्या तिच्या कुटुंबासोबत आनंदात जगत आहे. ब्रँड आणि जाहिराती, एंडॉर्समेंट्समधून ती बक्कळ कमाईही करते. मात्र आता ती हिंदी सिनेमात कधी दिसणार याची चाहते वाट पाहत आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा