Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हे" आहेत सोनाक्षी सिन्हाचे जुळे भाऊ! बहीण अभिनेत्री, तर भाऊ 'लव' आणि 'कुश' काय करतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 13:46 IST

सोनाक्षीला लव आणि कुश अशी जुळी भावंडं आहेत.

बॉलिवूडची "दबंग गर्ल" सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या आयुष्यातील आज महत्वपूर्ण दिवस आहे.आज सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न असून ते रजिस्टर मॅरेज करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबाकडून बऱ्याच प्रतिक्रिया समोर आल्या असून या नव्या जोडप्यासाठी सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. यातच सोनाक्षीच्या दोन्ही भावांची चर्चा रंगली आहे.  

सोनाक्षीला लव आणि कुश अशी जुळी भावंडं आहेत. सोनाक्षी आपल्या भावांपेक्षा वयाने जवळजवळ चार वर्षे लहान आहे. मात्र, तिचे दोघेही भाऊ स्टारडममध्ये तिच्या मागे आहेत. लव सिन्हा कुशपेक्षा काही मिनिटे मोठा आहे. लव आणि कुश सिन्हाचा जन्म ५ जून १९८३ रोजी झाला. लवने 'सदिया' (2010) या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याचवर्षी सोनाक्षीनेसुद्धा सलमान खानसोबत 'दबंग' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले होते. पहिल्याच सिनेमातून सोनाक्षी प्रसिद्धीझोतात आली, मात्र लव प्रसिद्ध मिळवण्यात अपयशी ठरला.

लव सिन्हाने 'सदियां'नंतर २०१८ मध्ये 'पलटन' आणि २०२३ मध्ये 'गदर २' या चित्रपटात काम केलं. पण, चित्रपटात यश मिळालं नाही म्हणून लवने वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत राजकारणात प्रवेश केला. सोनाक्षीचा दुसरा भाऊ कुशनेसुद्धा २०१० रोजी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याने सलमानच्या 'दबंग' साठी काम केलं होतं. तर रणबीर कपूरच्या एका चित्रपटासाठी त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. याशिवाय, २०२२ मध्ये त्याने 'निकिता रॉय' या चित्रपटाची घोषणा केली, ज्यामध्ये सोनाक्षी आहे.  पण, म्हणावं तेवढं यश त्याच्या वाट्याला आलं नाही.  

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाशत्रुघ्न सिन्हासेलिब्रिटीबॉलिवूडलग्न