Join us

"माझी सपोर्ट सिस्टीम गेली..."; प्रितीश नंदी यांच्यासाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 08:50 IST

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी तसेच लेखक प्रितीश नंदी यांचं काल बुधवारी निधन झालं.

Pritish Nandy Passes Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी तसेच लेखक प्रितीश नंदी यांचं काल बुधवारी निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रीतीश नंदी बॉलिवूडमधील नावाजलेल्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. त्याशिवाय ते एक पत्रकार देखील होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, प्रितीश नंदी यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, "माझा खूप जवळचा मित्र प्रितीश नंदी याच्या निधनाचं वृत्त समजताच मला धक्काच बसला आहे. अद्भूत कवी, लेखक आणि सिनेनिर्माता त्यासोबतच तो एक बहादुर आणि साहसी संपादक देखील होता.  मुंबईत मी आल्यानंतर माझ्या सुरुवातीच्या काळात प्रितीशने मला खूप मदत केली. त्याच्या निधनामुळे माझी सपोर्ट सिस्टीम गेली. त्याच्यासोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत."

अनिल कपूर यांची भावुक पोस्ट

प्रितीश नंदी यांच्या निधनानंतर अभिनेते अनिल कपूर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याद्वारे ते म्हणाले,"माझा मित्र प्रितीश नंदीच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे. तो एक साहसी संपादक आणि शब्दाला जागणारा माणूस. शिवाय तो इमानदारीचं प्रतीक होता." अशी आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

करीना कपूरने व्यक्त केली हळहळ

अभिनेत्री करीना कपूरने देखील प्रितीश नंदी यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली आहे. 'चमेली' चित्रपटाच्या सेटवरील फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून तिने प्रितीश नंदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रितीश नंदी हे पत्रकारिता क्षेत्रातील मोठं नाव आहे. 'द इलस्ट्रेज वीकली ऑफ इंडिया'चे ते संपादक होते. त्याचबरोबर १९९० च्या काळात दुरदर्शनवरील नंदी एक टॉक शो देखील होस्ट केला. प्रितीश नंदी शो असं त्या कार्यक्रमाचं नाव होतं. या शोमध्ये त्यांनी बऱ्याच सेलिब्रेटिंच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. प्रितीश नंदी कम्युनिकेशनद्वारे त्यांनी 'कांटे', 'सुर', 'झंकार बीट्स', 'चमेली' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा