Join us

'फायटर'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर, चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 20:08 IST

'फायटर' या चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा लूक रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिका सध्या 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा लूक रिलीज करण्यात आला आहे.

दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावर तिच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन तिनं चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती दिली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' या  चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण हा स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड ही भूमिका साकारणार आहे. 

दीपिका पदुकोणनं तिच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर -मीनल राठोड  कॉल साइन- मिन्नी, डेजिग्नेशन - स्क्वाड्रन पायलट, यूनिट- एयर ड्रॅगन्स'.दीपिका पदुकोणच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. फायटरमध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तशी ही पहिलीच वेळ असेल जेव्हा हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.'फायटर' हा चित्रपट पुढच्या वर्षी  25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडसेलिब्रिटी