Join us

राशी खन्नाने हैद्राबादमध्ये घेतलं आलिशान घर; वास्तूशांतीच्या पुजेचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:08 IST

Rashi khanna: राशीचं हैद्राबादप्रमाणेच हरियाणामध्येही आलिशान घर आहे.

राशी खन्ना हे नाव सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. (Farzi) या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली.  सध्या राशी तिच्या नव्या घरामुळे चर्चेत येत आहे. राशीने नुकतंच हैद्राबादमध्ये आलिशान घर खरेदी केलं असून या घराची वास्तूशांत नुकतीच पार पडली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या राशीने नुकतंच हैदराबादमध्ये घर खरेदी केलं आहे. या घराच्या वास्तुशांतीचे फोटो समोर आले आहेत. यावेळी राशीची आई, कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.  या घरासोबतच राशीचं हरियाणामध्येही मोठं घर आहे. तसंच राशीला लक्झरी लाइफची विशेष आवड आहे. तिच्याकडे लक्झरी कारचं बरंच मोठं कलेक्शन आहे. या कलेक्शनमध्ये ऑडी क्यू7 (Audi Q7), बीमएडब्ल्यू 520डी (BMW 520D) आणि रेंज रोवर वोग (Range Rover Vogue) यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, राशी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक गाजलेल्या सिनेमा, वेबसीरिजमध्ये झळकलेली राशी लवकरच द साबरमती रिपोर्टमध्ये झळकणार आहे. तसंच ती अरनमानई 4 , तेलुसू काडा या दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमावेबसीरिज