बॉलिवूडमध्ये कधी कोणाचा काडीमोड होईल सांगता येत नाही. ब्रेकअप, पॅचअप जसं इथे नॉर्मल आहे तसंच घटस्फोट, दुसरं लग्न हेही अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेकांनी आपला १२-१३ वर्षांचा संसार मोडला आहे. हृतिक रोशन, ईशा देओल, ईशा कोप्पिकर, सोहेल खान, आमिर खान अशा अनेक कलाकारांनी कित्येक वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला. यातच एक अभिनेता असा आहे ज्याने १४ वर्षांचा संसार मोडून दुसरं लग्न केलं. आणि दुसऱ्या बायकोसोबत तो हनिमून नाही तर थेट थेरपी घ्यायलाच गेला. कोण आहे हा अभिनेता?
अभिनेता, गायक, निर्माता, लेखक, गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अशी बहुगुणी ओळख असलेला हा अभिनेता आहे फरहान अख्तर (Farhan Akhtar). फरहान अख्तरने २००० साली हेअरस्टायलिस्ट अधुना भबानीसोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलीही झाल्या. मात्र दोघांनी २०१७ साली म्हणजेच तब्बल १७ वर्षांनी घटस्फोट घेतला. यानंतर काही वर्षांनी फरहान शिबानी दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये आला. २०२२ मध्ये त्यांनी लग्नही केलं. रिया चक्रवर्तीला दिलेल्या पॉडकास्टमध्ये दोघांनी खुलासा केला की लग्नानंतर दोनच दिवसात दोघंही थेरपीसाठी गेले. ही कपल थेरपी होती ज्याचा त्यांना फायदा झाला.
फरहान म्हणाला होता की, "हे जिमला जाण्यासारखंच आहे. तुम्हाला यावर काम करत राहावं लागतं. आम्ही अनेक सेशन घेतले. अनेकदा तर असंही व्हायचं की आमच्याकडे बोलायला फार काही नसताना आम्ही थेरपीसाठी आतमध्ये जायचो. त्यांना पाहून थेरपिस्टनाही धक्का बसला होता. तुम्ही इथे काय करताय. २४ तासापूर्वीच तर तुमचं लग्न झालं ना? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.