प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियाल याच्या लग्नाच्या चर्चांनी गुरुवारी सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली. जुबिनने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, खरी गोष्ट कळताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. डेहराडूनचा रहिवासी असलेल्या जुबिनने दीड वर्षापूर्वीच गुपचुप लग्न केले आहे. खुद्द जुबिनचे वडील रामशरण नौटियाल यांनी एका मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना जुबिनचे वडील रामशरण नौटियाल यांनी सांगितले की, जुबिनने कोणताही गाजावाजा न करता दीड वर्षांपूर्वीच अतिशय पारंपरिक पद्धतीने लग्न केले आहे. त्याने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबतच सात फेरे घेतले आहेत. या लग्नात केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही मोजकेच जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. जुबिनचे हे लग्न घराबाहेर पार पडल्याचेही त्यांनी सांगितले, मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
जुबिनचे वडील रामशरण नौटियाल हे राजकारणात सक्रिय आहेत. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी डेहराडून जिल्ह्यातील चक्रता मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना काँग्रेसच्या प्रीतम सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी ते दोन वेळा सुमारे १० वर्षे डेहराडून जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिले आहेत.
आपल्या श्रवणीय आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुबिनने 'रातां लंबियां', 'लुट गए', 'तुम ही आना', 'काबिल हूं' आणि 'अंख लड जावे' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. काही महिन्यांपूर्वी जुबिन आणि अभिनेत्री निकिता दत्ता यांच्या लग्नाच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र, त्यावेळी जुबिनने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या आणि आपण फक्त चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. आपल्या व्यस्त कामामुळे कोणतीही मुलगी आपल्यासोबत राहू शकणार नाही, असे तो गमतीने म्हणाला होता.
आता तो दीड वर्षांपासून विवाहित असल्याचे समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या गायकाने लग्नाचे गुपित इतका काळ जपून ठेवल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Web Summary : Amidst wedding rumors, Jubin Nautiyal's father disclosed that the singer secretly married his childhood sweetheart 1.5 years ago in a private ceremony with close family. Nautiyal had previously denied wedding rumors with actress Nikita Dutta, stating they were just friends.
Web Summary : शादी की अफवाहों के बीच, जुबिन नौटियाल के पिता ने खुलासा किया कि गायक ने 1.5 साल पहले अपने बचपन के प्यार से गुपचुप शादी कर ली थी। समारोह में परिवार के सदस्य ही शामिल थे। नौटियाल ने पहले अभिनेत्री निकिता दत्ता के साथ शादी की अफवाहों का खंडन किया था।