Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याकडे थार गाडीच नाही...",रॅपर बादशाहने वाहतूक नियम तोडल्याच्या आरोपांचं केलं खंडन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:07 IST

प्रसिद्ध रॅपर बादशाहविषयी (Badshah) सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा आहे.

Badshah : प्रसिद्ध रॅपर बादशाहविषयी (Badshah) सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुरुग्राम ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर कार वाई करत त्याच्याकडून चलन वसूल केलं आहे. बादशहा १५ डिसेंबरच्या गुरुग्राम येथील एरिया मॉलमध्ये बादशहाची कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. याच ठिकाणी घाई घाईत पोहोचण्याच्या गडबजीत त्याने चूक केली. महिंद्रा थारमध्ये घेऊन  तो कॉन्सर्टच्या दिशेने जात असतानाा त्याने चुकीच्या दिशेने गाडी नेली आणि त्याला वाहतूक पोलिसांच्या कारावाईचा सामना करावा लागला. या सगळ्या चर्चांवर अखेर बादशाहने स्पष्टीकरण दिलं आहे. 

बाहशहाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्याने या सगळ्या आरोपाचं खंडण केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून बादशहाने लिहिलंय, "भाई! माझ्याकडे तर थार गाडीच नाही आहे. शिवाय त्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतो. तेव्हा मी माझ्या व्हाईट वेलफायरमधून जात होतो. आम्ही नेहमीच जबाबदारीने वाहतूक करतो. मग ती गाडी असो किंवा गेम!" असं त्याने म्हटलं आहे. 

हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, गुरुग्राम पोलीस आयुक्त विरेंद्र वीज यांनी सांगितलं की, ती थार गाडी एक व्यक्ती चालवत होता. त्याचं नाव दिप्रेंद्र हुडा असं आहे. चुकीच्या पद्धतीने आणि धोकादायक ड्रायव्हिंगमुळे मोटर अधिनियमच्या तीन कलमांनुसार दिप्रेंद्र हुडाला पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

टॅग्स :बादशहाबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया