Join us

"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 10:46 IST

ईशा देओलने नुकतंच एका मुलाखतीत मुलींच्या पालनपोषणावर भाष्य केलं.

अभिनेत्री ईशा देओल (Esha Deol) आणि पती भरत तख्तानीचा (Bharat Takhtani) गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्यांचा १२ वर्षांचा संसार मोडला. त्यांना दोन मुली आहेत ज्यांचा सांभाळ ईशा करत आहे. तर भरत तख्तानी यांच्या आयुष्यात नवं प्रेम आलं आहे. नुकतंच त्यांनी मेघना लखानीचं त्यांच्या कुटुंबात स्वागत अल्याची पोस्ट केली होती. तिच्यासोबत कोझी फोटोही शेअर केला होता. या सगळ्यानंतर आता ईशा देओलने एका मुलाखतीत तिच्या या नवीन आयुष्यावर भाष्य केलं.

'ममाराझी'ला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओल म्हणाली, "मी स्वत:ला सिंगल मदर असं समजत नाही. ना मी सिंगल मदर आहे आणि ना मी तशी वागते. तसंच इतरांनाही स्वत:बद्दल मी तसं बोलू देत नाही. कधी कधी आयुष्य जगताना काही कारणांमुळे आपल्या भूमिका बदलतात. जर दोन जणांचं नातं आधीसारखं राहीलं नसेल तर त्यांना आपल्या मुलांचा विचार करुन एक नवीन मार्ग निवडावा लागतो. मुलांसाठी कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवलं पाहिजे. मी आणि भरत हेच करतो."

काही दिवसांपूर्वी ईशा देओलने सासरी मिळणाऱ्या वागणुकीवरही भाष्य केलं होतं. ईशा म्हणालेली, "भरत मला लाईफस्टाइल मेन्टेन करायला सांगायचा. मी वजन वाढवू नये असंही त्याने मला सांगितलं होतं. मला छोटे कपडे घालण्याचीही परवानगी नव्हती."

९० च्या काळात ईशा बॉलिवूडमध्ये सक्रीय होती. 'धूम', 'ना तुम जानो ना हम, 'आँखे','राज ३', 'LOC कारगिल' या सिनेमांमध्ये ती दिसली. तर आता अनेक वर्षांनी तिने 'तुमको मेरी कसम' या सिनेमातून कमबॅक केलं.

टॅग्स :इशा देओलबॉलिवूडघटस्फोट