Join us

हर्षवर्धन राणेचा 'एक दीवाने की दिवानियात' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, OTT वर कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 10:29 IST

विशेष म्हणजे, 'एक दीवाने की दिवानियात'ने आपल्या बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे.

Ek Deewane Ki Deewaniyat OTT Release: अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "एक दीवाने की दिवानियात" या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिवाळीत २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे.  या रोमँटिक ड्रामाने प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता या चित्रपटाच्या OTT रिलीज बद्दल चर्चा सुरू झाली आहे.

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा (Sonam Bajwa) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे डिजिटल हक्क नेटफ्लिक्सने (Netflix)  विकत घेतले आहेत. त्यामुळे 'एक दीवाने की दिवानियात' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास साधारणपणे ४५ ते ६० दिवस लागतात. या आधारावर, 'एक दीवाने की दिवानियात' डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाइन स्ट्रीम होऊ शकतो, असा अंदाज आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अधिकृत रिलीज डेटची घोषणा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे, जर तुम्ही अद्याप हा रोमँटिक ड्रामा थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर तुम्हाला एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तो नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

खर्चाच्या दुप्पट कमाई

हा चित्रपट सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. विशेष म्हणजे, 'एक दीवाने की दिवानियात'ने आपल्या खर्चाच्या दुप्पट कमाई केली आहे. चित्रपटाचं कलेक्शन सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. हर्षवर्धन राणेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा 'सनम तेरी कसम' हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला, त्याशिवाय त्याने 'हसीन दिलरुबा', 'तारा व्हर्सेस बिलाल', 'तैश', 'फिदा', 'सवी', 'द मिरिंडा ब्रदर्स' यांसारख्या सिनेमात काम केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Harshvardhan Rane's 'Ek Deewane Ki Deewaniyat' Success: OTT Release Soon?

Web Summary : Harshvardhan Rane's 'Ek Deewane Ki Deewaniyat,' a box office hit, may stream on Netflix in early December. The romantic drama, also starring Sonam Bajwa, has garnered approximately ₹100 crore against a ₹30-35 crore budget. Official release date is awaited.
टॅग्स :हर्षवर्धन राणेसिनेमाबॉलिवूड