Join us

प्रेग्नेंसीच्या चर्चेदरम्यान Katrina Kaifनं सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!, चाहते करताहेत शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:07 IST

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नेंसीच्या वृत्तांमुळे सातत्याने चर्चेत येत असते.

विकी कौशल(Vicky Kaushal)ची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) प्रेग्नेंसीच्या वृत्तांमुळे सातत्याने चर्चेत येत असते. मात्र अद्याप त्या दोघांनी वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, आता कतरिना कैफने तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे, जी ऐकून सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत.

कतरिना कैफ इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. काही वेळापूर्वी, कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने हा नवीन फोटो पोस्ट करून एक 'गुड न्यूज' शेअर केली आहे, ज्यावर तिचे चाहते तिचे मनापासून अभिनंदन करत आहेत.

कतरिनाच्या गरोदरपणाच्या बातम्या येत आहेत आणि या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीची 'गुड न्यूज' या विषयाशी संबंधित असेल असे तुम्हाला वाटत असेल. पण असे नाही. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे की तिने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ७० दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. ही 'गुड न्यूज' शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत की त्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला आहे.

कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चेवर तिच्या आणि विकीच्या उत्तराची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच फोन भूत चित्रपटात झळकली होती. लवकरच ती बहुप्रतीक्षित सलमान खानच्या टायगर ३ चित्रपटात झळकणार आहे. तर विकी कौशल शेवटचा गोविंदा मेरा नाम चित्रपटात पाहायला मिळाला होता. तो सॅम बहादूर चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफ