Join us

शाहरुख AskSRK सेशनमध्ये स्वत: उत्तरं देतो का? किंग खाननेच केला खुलासा, म्हणाला, 'माझी टीम...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:23 IST

आस्क एसआरके चे ट्वीट स्वत: शाहरुख करतो की त्याची टीम?

अभिनेता शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) यंदाचं वर्ष अत्यंत खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने 'पठाण' हा सुपरहिट सिनेमा केला. तर काहीच महिन्यात 'जवान' या सिनेमातून धुमाकूळ घातला. आता डिसेंबर महिन्यात त्याचा 'डंकी' रिलीज होत आहे. हा सिनेमाही सुपरहिट होईल असा अंदाज आहे. शाहरुखने दमदार कमबॅक करत आपणच बॉलिवूडचा किंग असल्याचं सिद्ध केलंय. दरम्यान शाहरुख अनेकदा ट्वीटरवर आस्क एसआरके सेशनमधून चाहत्यांशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या ट्वीट्सना मजेशीर उत्तरं देत असतो. पण हे ट्वीट खरंच शाहरुख स्वत: करतो की त्याची टीम करते असा प्रश्न अनेकांना पडला असेलच. याचंच उत्तर शाहरुखने नुकतंच दिलं आहे.

शाहरुखने २ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी तो फॅन्स मीट इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा शाहरुखला त्याच्या आस्क एसआरके सेशनबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, "बरेच जण मला हा प्रश्न विचारतात की माझी टीम आस्क एसआरके सेशनमध्ये उत्तरं देत असते का? तर नाही. मी स्वत: त्या सर्व ट्वीट्सची उत्तरं देत असतो. अनेकदा लोक असा विचार करतात की माझ्या सोशल मीडियावर लिहिलेलं काहीही..म्हणजेच जे कामाशी संबंधित असतं त्यासाठी मी टीमची मदत घेतो. फिल्म्स, इतर प्रोजेक्ट्सचे ट्वीट मी त्यांना करायला सांगतो. पण चाहत्यांशी वैयक्तिक संवाद साधताना मी स्वत: माझं अकाऊंट हँडल करत असतो." 

शाहरुखचा आगामी 'डंकी' हा सिनेमा २२ डिसेंबर रोजी रिलीज होतोय. राजकुमार हिरानींच्या या सिनेमात तो पहिल्यांदाच काम करत आहे. यामध्ये तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी यांचीही मुख्य भूमिका आहे.

टॅग्स :शाहरुख खानट्विटरबॉलिवूड