Join us

या चिमुकलीला ओळखलंत का? मानधनाच्या बाबतीत सलमान, अक्षय, कतरिनालाही टाकते मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 17:36 IST

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आता एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान आता एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती मानधनाच्या बाबतीत सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ या सारख्या कलाकारांना मागे टाकते. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री बनली आहे. तिच्या चित्रपटांची जगभरातील कमाई ८४४५ कोटी रुपये होती. यामध्ये ६२०० कोटी हा आकडा फक्त त्याच्या बॉलिवूड चित्रपटांचा आहे. याशिवाय ३४५ मिलियन डॉलर तिच्या हॉलिवूड चित्रपट XXX: द रिटर्न ऑफ झेंडर केजचे आहेत. या जबरदस्त कमाईने तिला तिच्या समकालीन अभिनेता अभिनेत्रींपेक्षा खूप पुढे नेले आहे. २०२२ पर्यंत या यादीत दीपिका पादुकोणचा क्रमांक मागे होता. पण २०२३ मध्ये रिलीज झालेल्या पठाण आणि जवानच्या कमाईमुळे ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या दोन्ही चित्रपटांची जगभरात एकूण कमाई २२०० कोटी रुपये आहे. 

सलमान खान, अक्षय कुमारलाही दीपिकाने टाकले मागेगेल्या वर्षीच्या कमाईच्या आकड्यांनंतर दीपिका पादुकोणने सलमान खान आणि अक्षय कुमारसारख्या स्टार्सनाही मागे टाकले आहे. शाहरुख खान हा एकमेव स्टार आहे ज्याला दीपिका पादुकोण मागे टाकू शकली नाही. किंग खानच्या चित्रपटांनी ९ हजार कोटींची जगभरात कमाई केली. तर अक्षय कुमार याबाबतीत ८२०० कोटींपर्यंत पोहचला आहे. सलमान खानच्या जगभरातील कमाईचा आकडा ७२०० कोटी रुपये आहे आणि आमिर खानच्या चित्रपटांची एकूण कमाई ७ हजार कोटी रुपये आहे. या बाबतीत दीपिका पादुकोण या स्टार्सपेक्षा खूप पुढे आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणसलमान खानअक्षय कुमार