Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 11:02 IST

Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार  यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली.

Diwali 2022 : यंदा दिवाळसणं उत्साहात साजरा झाला. कोरोना महामारी आणि मग लॉकडाऊन यामुळे आयुष्याला काहीसा ब्रेक लागला होता. पण आता कोरोनाचं संकट संपलं आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सर्वांनी धडाक्यात साजरी केली. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नव्हते. यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार  यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली.

विकी कौशलने त्याच्या घराची ‘लक्ष्मी’ अर्थात पत्नी कतरिना कैफसोबत लक्ष्मीपूजन केलं. याचे खास फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ‘घरच्या लक्ष्मीसोबत लक्ष्मीपूजन झालं... तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभ दीपावली,’असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केलेत.

अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी आपल्या ऑफिसात लक्ष्मीपूजन केलं. दरवर्षी अक्षय आपल्या ऑफिसात पूजा करतो. याचा खास व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. रोशनी, रंग और उनसे भी प्यारी मुस्कुराहटें... साल का मेरा सबसे अच्छा दिन..., असं लिहित त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

शाहरूख खान याने ऑफिसात लक्ष्मीपूजन केलं. यावेळी गौरी खानही त्याच्यासोबत होती. घरी मन्नतवरही दिवाळी साजरी झाली. खान कुटुंबाने बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांनाही हजेरी लावली.

आलिया भट व रणबीर कपूरची ही लग्नानंतरची पहिली दिवाळी होती. आलिया भट प्रेग्नंट आहे आणि लवकरच आई होणार आहे. यंदाची दिवाळी रणबीर व आलियाने नीतू कपूरसोबत साजरी केली. मुलीच्या पहिल्या दिवाळ सणाला आलियाची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भटही आली होती.

कंगना राणौतने आपल्या कुटुंबासोबत लक्ष्मीपूजन केलं. कंगनाने इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात कंगना पूजा करताना दिसतेय. घर दिव्यांनी सजवताना दिसतेय.

माधुरी दीक्षित हिच्या घरीही लक्ष्मीपूजन झालं. माधुरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पिवळ्या साडीतील माधुरी पूजेची तयारी करताना दिसतेय. 

करिना कपूरनेही दिवाळी साजरी केली. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये सैफ आणि करीना आहेत. तिसरा फोटो तैमूर-जेहचा आहे.  चौथ्या फोटोमध्ये जेह जमिनीवर लोळत रडताना असून तैमूर त्यांच्याकडे पाहताना दिसतो. त्याच्याकडे लक्ष न देता सैफ-करीना तैमूरसह फोटो काढण्यामध्ये व्यग्र असल्याचे पाहायला मिळतेय. 

टॅग्स :दिवाळी 2022विकी कौशलकतरिना कैफअक्षय कुमारआलिया भटबॉलिवूड