Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! दिशाने मोनोकनीमधील फोटो केला शेअर, पण 'या' कारणाने झाली ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 10:01 IST

या फोटोत दिशा पटनी एका बीचवर असल्याचे दिसते. या फोटोला तसं दिशाने काही कॅप्शन दिलेलं नाही, पण जिराफचा इमोजी टाकलाय.

अभिनेत्री दिशा पटनी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी कामाच्या बाबतीत तर कधी तिच्या रिलेशनशिपमुळे. आता दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची चर्चा सुरू आहे. यात ती पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये एक फोटो शेअर केलाय. पण हा फोटो स्पष्ट दिसत नसल्याने लोकांनी तिचा ट्रोल करणं सुरू केलं.

या फोटोत दिशा पटनी पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये पोज देताना दिसत आहे. या फोटोत ती एका बीचवर असल्याचे दिसते. या फोटोला तसं दिशाने काही कॅप्शन दिलेलं नाही, पण जिराफचा इमोजी टाकलाय. तसे तर दिशाचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. पण हा फोटो स्पष्ट नाही. फोटोच्या क्वालिटीवरून लोक तिला ट्रोल करू लागले आहेत. कुणी म्हणालं चांगला फोन विकत घे तर कुणी अजून काही म्हणाले. (म्हणे, सलमान खूपच गोड...! दिशा पटानी ‘भाईजान’वर फिदा, क्षणात दिला होकार)

एका यूजरने लिहिले की, स्वस्त फोनमधून हा फोटो काढलाय. तर इतर काही यूजर्सनी दिशाचा हा फोटो चांगला पण खराब क्वालिटीचा असल्याचं सांगितलं. काही लोकांना तिचा हा फोटो पसंत पडला आहे. काही दिवसांपूर्वीच दिशाने टायगर श्रॉफसोबत परफॉर्म करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

दिशा ज्या गाण्यावर डान्स करताना दिसली होती ते गाणं टायगर श्रॉफच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओतील आहे. यात टायगरने परफॉर्मही केलंय आणि गाणंही गायलंय. याच गाण्याववर दिशाने डान्स केला.

दिशाच्या कामाबाबत सांगायचं तर ती शेवटची सलमान खानच्या भारत सिनेमात दिसली होती. यातील तिचा डान्सही हिट झाला होता. आता ती पुन्हा सलमानच्य आगामी 'राधे' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणदीप हुड्डाचीही महत्वाची भूमिका असणार आहे.  तर या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभु देवा करणार आहे.  

टॅग्स :दिशा पाटनीबॉलिवूडसोशल मीडिया