आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' १९ मार्चला प्रदर्शित झाला होता. बॉक्सऑफिसर धुमाकूळ घातल्यानंतर आता सिनेमा ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. रिलीजच्या अडीच महिन्यांनंतर सिनेमा ओटीटीवर येणार आहे. सिनेमा कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार हे समोर आलं आहे. हा अॅक्शन पॅक थ्रिलर सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' ५ जून रोजी जिओ हॉटस्टारवर येत आहे. आदित्य धर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनासाठी जिओ हॉटस्टारने एक अनोखी संकल्पना राबवली आहे. हा चित्रपट ५ जूनपासून स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार असला, तरी ४ जून रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना एका विशेष ३० मिनिटांच्या 'प्री-शो'चा आनंद घेता येईल. या प्री-शोमध्ये चित्रपटातील कलाकार आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त यांच्या मनमोकळ्या गप्पा, पडद्यामागचे किस्से आणि चित्रीकरणादरम्यानच्या मजेशीर आठवणी पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढेल.
या डिजिटल प्रीमियरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटाची 'RAW & Uncut'आवृत्ती पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाची तीव्रता, भव्यता आणि मूळ कथा कोणत्याही फिल्टरशिवाय प्रेक्षकांसमोर मांडली जाईल. जिओ हॉटस्टारचे हिंदी आणि इंग्लिश एंटरटेनमेंट बिझनेस हेड आलोक जैन यांच्या मते, ही केवळ एक डिजिटल रिलीज नसून एक सांस्कृतिक अनुभव देण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रेक्षकांना केवळ चित्रपट पाहायला मिळणार नाही, तर त्या प्रक्रियेशी अधिक जवळून जोडले जाता येईल.
'धुरंधर: द रिव्हेंज' हा एक हाय-स्टेक स्पाय ॲक्शन थ्रिलर असून, याची कथा आणि दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे. ४ जूनपासून सुरू होणाऱ्या या अनोख्या स्ट्रीमिंग अनुभवासाठी आणि अनुभव घेण्यासाठी देशभरातील सिनेप्रेमी आता सज्ज झाले आहेत.
Web Summary : Aditya Dhar's 'Dhruvandhar: The Revenge' streams on Jio Hotstar from June 5th. A special pre-show featuring the cast will air on June 4th. The film will be available in a 'RAW & Uncut' version.
Web Summary : आदित्य धर की 'ध्रुवंधर: द रिवेंज' 5 जून से जियो हॉटस्टार पर स्ट्रीम होगी। 4 जून को कलाकारों के साथ एक विशेष प्री-शो प्रसारित होगा। फिल्म 'रॉ एंड अनकट' संस्करण में उपलब्ध होगी।