Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर' एकाच वेळी सहा देशांत बॅन, 'या' पाकिस्तान प्रेमी देशांना झोंबली मिरची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:38 IST

'या' देशांनी बहुचर्चित 'धुरंधर' चित्रपटावर घातली बंदी

 Dhurandhar Banned In Six Gulf Countries : बॉलिवूडमध्ये सध्या 'धुरंधर' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. पण, काही देशांनी या बहुचर्चित चित्रपटावर बंदी घातली आहे.

आखाती देशांमध्ये 'धुरंधर'वर थेट बंदी घालण्यात आली आहे. 'धुरंधर' हा बहरीन,ओमान, कतार,  कुवेत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात यासारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाही. या बंदीमुळे केवळ चित्रपट निर्मात्यांनाच नाही, तर या देशांतील बॉलिवूड चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

बंदी घालण्याचं नेमकं कारण काय?

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, 'धुरंधर'वर बंदी घालण्यामागे मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाची पार्श्वभूमी आणि कथानक थेट पाकिस्तानशी जोडलेले आहे. या आखाती देशांनी 'धुरंधर'ला 'पाकिस्तानविरोधी चित्रपट म्हणून पाहिले जात आहे. या क्षेत्रात अनेकदा अशा प्रकारच्या विषयांवर आधारित चित्रपटांना प्रदर्शनाची परवानगी मिळत नाही.  'धुरंधर'ची कथा स्पष्टपणे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पर्दाफाश करते, ज्यामुळे या देशांतील सेन्सॉर बोर्डांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला.

हे पहिल्यांदाच घडलेले नाही. मध्य पूर्वेतील देशांनी यापूर्वीही राष्ट्रीय सुरक्षेवर आणि राजकीय संबंधांवर आधारित अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' आणि जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' या चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय, 'आर्टिकल ३७०' आणि सलमान खानच्या 'टायगर ३' ला देखील प्रदर्शनावेळी अशाच अडचणींचा सामना करावा लागला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar' banned in six countries; Pakistan-loving nations feel the heat!

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar,' starring Ranveer Singh, faces ban in Gulf nations like Bahrain and Saudi Arabia. The film's anti-Pakistan narrative, exposing Pakistan-sponsored terrorism, led to the ban. Similar Indian films faced prior restrictions due to national security concerns.
टॅग्स :अक्षय खन्नासौदी अरेबियाकतारसंयुक्त अरब अमिरातीरणवीर सिंग