सध्या बॉक्स ऑफिसवर धुरंधर चित्रपट चांगलाच गाजत आहे. अनेकजण या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. तर काही जण याला अजेंडापट अशी उपमा देत आहेत. मात्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांसह दिग्दर्शक आदित्य धर यांचंही कौतुक होत आहे. मात्र धुरंधरच्या यशामुळे सध्या यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवणारे आदित्य धर हे एकेकाळी क्रिकेटपटू बनू इच्छित होते. ते चांगलं क्रिकेटही खेळायचे. मात्र बीसीसीआयच्या एका माजी अध्यक्षांच्या मुलामुळे त्यांची भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड होऊ शकली नाही. त्यामुळे निराश झालेल्या आदित्य धर यांनी करिअरसाठी इतर क्षेत्रांकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि ते चित्रपट निर्मितीकडे वळले.
धुरंधर आणि धुरंधर: द रिव्हेंज असे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिल्याने आदित्य धर यांच्या दिग्दर्शन कौशल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता यशस्वी दिग्दर्शक म्हणून गणना होत असलेल्या आदित्य धर यांच स्वप्न एक चांगला दिग्दर्शक होण्याचं नव्हे तर क्रिकेटपटू होण्याचं होतं. आदित्य धर हे दिल्ली विद्यापीठाकडून अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून आंतरविद्यापीठीय क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायचे.
मात्र २००२ मध्ये आदित्य धर यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. २००२ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश होण्याची संधी आदित्य धर यांच्या हातून थोडक्यात हुकली. ऑफस्पिनर अष्टपैलू गोलंदाज म्हणून १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी आदित्य धर यांनी चाचणी दिली होती. पण आदित्य धर यांची निवड झाली नाही. तर आदित्य धर यांच्या जागी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी याची निवड भारतीय संघात झाली. भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी हुकल्याने आदित्य धर निराश झाले होते.
भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न भंगल्याने त्यांच्यासमोर आता पुढे काय करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तसेच पुढे ते सिनेसृष्टीकडे वळले. याबाबत प्रियदर्शन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, आदित्य धर क्रिकेटपटू होते. मात्र काही राजकीय प्रभावामुळे ते १९ वर्षांखालील क्रिकेट संघात जाऊ शकले नाहीत. त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आहे होते. तसेच ते निराश होऊन घरी बसले होते.
दरम्यान, आदित्य धर हे २००६ मध्ये मुंबईत आले. तसेच प्रियदर्शन यांच्यासोबत इंटर्न म्हणून काम सुरू केले. आदित्य यांनी काबुल एक्स्प्रेस, हाल ए दिल, डॅडी कूल सारख्या चित्रपटांमधील गाणी लिहिली. पुढे २०१९ मध्ये आदित्य धर यांनी उरी: द सर्जिकल स्ट्राईक, या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्यानंतर आर्टिकल ३७०, धूम धाम, बारामुल्ला यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आता धुरंधरच्या दोन भागांमुळे त्यांची गणना यशस्वी दिग्दर्शकांमध्ये होऊ लागली आहे.
Web Summary : Director Aditya Dhar, now celebrated for 'Dhurandhar,' once aspired to be a cricketer. His dream ended when he wasn't selected for the under-19 team, allegedly due to a BCCI official's son's selection. He then transitioned to filmmaking, finding success.
Web Summary : 'धुरंधर' के लिए सराहे गए निर्देशक आदित्य धर कभी क्रिकेटर बनना चाहते थे। बीसीसीआई अधिकारी के बेटे के चयन के कारण अंडर-19 टीम में उनका चयन नहीं हुआ, जिससे उनका सपना टूट गया। फिर उन्होंने फिल्म निर्माण में सफलता पाई।