Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2 Trailer: 'धुरंधर २'च्या ट्रेलरला लागलं 'ग्रहण'! रिलीज डेट पुढे ढकलणार? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:27 IST

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या जोरदार चर्चेत आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग आणि 'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित चित्रपट 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार होता, मात्र आता चाहत्यांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. चंद्रग्रहणामुळे निर्मात्यांनी ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार आदित्य धर आणि चित्रपटाची टीम या प्रोजेक्टबाबत अत्यंत महत्वांकाक्षी आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर आज होळी-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात येणार होता. मात्र आजच चंद्रग्रहण असल्याने सर्व गोष्टींचा विचार करुन  'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  'धुरंधर: द रिव्हेंज'च्या ट्रेलरची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून आता ५ मार्च रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा ट्रेलर लाँच करण्यात येईल, असं सांगितलं जातंय.

रणवीर सिंगचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट

'धुरंधर' हा एक हाय-ऑक्टेन ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून यात रणवीर सिंग एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट अत्यंत तगडी असून यात संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ट्रेलर पुढे ढकलल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली असली, तरी निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केले आहे. "चांगल्या कामासाठी थोडी वाट पाहावी लागली तरी चालेल, पण ट्रेलर धमाकेदार असावा," अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर  'धुरंधर: द रिव्हेंज' सुद्धा बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करेल असं सांगितलं जातंय.  'धुरंधर: द रिव्हेंज'ला यशच्या 'टॉक्सिक'शी तगडी स्पर्धा करावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhurandhar 2 Trailer Release Postponed Due to Lunar Eclipse

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar: The Revenge' trailer launch delayed due to the lunar eclipse. The high-octane action thriller, also starring Sanjay Dutt and R. Madhavan, will now premiere on March 5th at the Nita Mukesh Ambani Cultural Centre in Mumbai.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमाबॉलिवूडटेलिव्हिजनसेलिब्रिटी