आदित्य धरचा 'धुरंधर द रिव्हेंज' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत होता. १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले. जवळपास एक महिना हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला होता. मात्र आता एका हॉरर सिनेमाने 'धुरंधर २' ची हवा टाइट केली आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ने 'धुरंधर २'चं मार्केट डाऊन केलं आहे.
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' सिनेमा १७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रियदर्शन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकत्र आले. आणि त्यांच्या जोडीची जादू पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळाली. 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडी सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल २३.९० कोटींची कमाई केली. तर चारच दिवसांत सिनेमाने देशात ६४.७५ कोटी आणि जगभरात १०० कोटी कमावले आहेत.
'भूत बंगला' सिनेमा 'धुरंधर २'ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर देत आहे. 'धुरंधर २' प्रदर्शित होऊन ३३ दिवस झाले आहेत. पण आता हळूहळू 'धुरंधर २'ची जादू कमी होत असल्याचं दिसत आहे. ३३व्या दिवशी 'धुरंधर २'ने १.६२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत सिनेमाने १११७ कोटींचं कलेक्शन केलं आहे.
Web Summary : Akshay Kumar's horror-comedy 'Bhoot Bungalow' is dominating the box office, overshadowing 'Dhurandhar 2'. 'Bhoot Bungalow' earned ₹23.90 crore on its first day and ₹64.75 crore in India within four days. 'Dhurandhar 2', after 33 days, has collected ₹1117 crore but its momentum is slowing.
Web Summary : अक्षय कुमार की हॉरर-कॉमेडी 'भूत बंगला' बॉक्स ऑफिस पर छाई हुई है, 'धुरंधर 2' को पीछे छोड़ दिया। 'भूत बंगला' ने पहले दिन ₹23.90 करोड़ और चार दिनों में भारत में ₹64.75 करोड़ कमाए। 'धुरंधर 2' ने 33 दिनों में ₹1117 करोड़ का कलेक्शन किया है, लेकिन इसकी गति धीमी हो रही है।