Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे झाले होते देवानंद; तिच्यासाठी धाय मोकलून रडला होता अभिनेता, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 15:12 IST

Dev anand: देवानंद ज्या अभिनेत्रीवर प्रेम करायचे तिने सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, अचानक त्यांच्या नात्यात एक वळण आलं आणि ते कायमचे विभक्त झाले.

बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता म्हणून कायम देवानंद यांच्याकडे पाहिलं जायचं. अनेक भूमिका साकारणारे देवानंदर अँग्री यंग मॅन, चॉकलेट हिरो, रोमान्स किंग अशा कितीतरी नावाने ते ओळखले जायचे. विशेष म्हणजे आजही नेटकऱ्यांमध्ये त्यांची वरचेवर चर्चा रंगत असते.  त्या काळी देवानंद यांची तुफान क्रेझ होती. तरुणींच्या गळ्यातले तर ते ताईत होते.  लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे देवानंद एका अभिनेत्रीसाठी मात्र वेडेपिसे झाले होते. या अभिनेत्रीसाठी ते धाय मोकलून रडले होते.

सोशल मीडियावर बरेचदा कलाकारांचे जुने व्हिडीओ वा फोटो व्हायरल होत असतात. यात देवानंद यांचा एक जुना इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या प्रेमाविषयी भाष्य केलं आहे. देवानंद यांचं अभिनेत्री सुरैय्या यांच्यावर मनापासून प्रेम होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. याविषयी बोलतांना त्यावेळी मी खूप रडलो होतो असंही त्यांनी सांगितलं.

"मी तिला प्रपोज केलं होतं तिने सुद्धा माझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. तिच्या आईला आमचं नातं मान्य होतं. मात्र, तिच्या आजीला ( आईची आई) हे नातं मान्य नव्हतं. एका मुस्लीम मुलीने हिंदू धर्मीय व्यक्तीसोबत लग्न करणं तिच्या आईला मान्य नव्हतं. मी तिला प्रपोज करण्यासाठी अंगठी पाठवली होती. मात्र, तिच्या आजीच्या नकारामुळे तिने हे प्रपोजल रिजेक्ट केलं. त्यानंतर तिने भेटीगाठीही कमी केल्या. या घटनेमुळे मी प्रचंड रडलो होतो. माझ्या भावासमोर मी ढसाढसा रडून मन मोकळं केलं होतं," असं त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.

दरम्यान, देवानंद या प्रकारानंतर आयुष्यात पुढे वळाले. त्यांनी १९५४ मध्ये कल्पना कार्तिकसोबत लग्न केलं. तर, सुरैय्याने मात्र आयुष्यात कधीच लग्न केलं नाही. ती शेवटपर्यंत अविवाहित राहिली.

टॅग्स :बॉलिवूडदेव आनंदसेलिब्रिटीसिनेमासुरैय्या