बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा आई-बाबा होणार आहे. आणि त्यांची लेक दुवा मोठी ताई होणार आहे. दीपिका पादुकोणने दुवाचा एक फोटोसोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये तिच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट आहे. ही आनंदाची बातमी मिळताच चाहते आणि सेलिब्रिटींनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, जेव्हा दीपिका पहिल्यादा गरोदर राहिली होती, तेव्हा तिनं 'सिंघम ३' आणि 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाचं शुटिंग केलं होतं. आता दुसरं बाळ पोटात असताना दीपिका बिग बजेट चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका सध्या गरोदरपणातही आपल्या आगामी 'राका' (Raaka) या बिग बजेट पॅन इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुन सोबत स्क्रीन शेअर करत आहे. धक्कादायक आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, या स्थितीतही दीपिका केवळ साधे सीन्स नाही, तर चित्रपटातील काही थरारक अॅक्शन सीक्वेन्स स्वतः शूट करणार आहे.
'जवान' फेम दिग्दर्शक अॅटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दीपिका आपल्या कामाच्या बाबतीत कमालीची प्रोफेशनल असून, ठरलेल्या वेळेत शुटिंग पूर्ण करण्यावर तिचा भर आहे. 'राका' व्यतिरिक्त शाहरुख खानच्या बहुचर्चित 'किंग' या चित्रपटाचेही काही भाग दीपिकाला पूर्ण करायचे आहेत. साइन केलेले प्रोजेक्ट्स अर्धवट राहू नयेत, यासाठी गरोदर असतानाही काम सुरूच ठेवण्याचा मोठा निर्णय तिने घेतला आहे.
आरोग्याची घेतली जातेय विशेष काळजीप्रेग्नेंसीमध्ये अॅक्शन सीन्स शूट करणे जोखमीचे असले, तरी दीपिका आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तिच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेत आहे. शूटिंगदरम्यान तिच्यावर कोणताही ताण येणार नाही आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच सर्व गोष्टी केल्या जातील, याची खात्री टीमकडून दिली जात आहे. तिच्या या जिद्दीमुळे चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील सहकाऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
Web Summary : Deepika Padukone, expecting her second child, is filming action sequences for the pan-India film 'Raaka' with Allu Arjun. Despite the risks, she prioritizes completing projects like 'King' while ensuring her health and safety with full team support. She previously filmed during her first pregnancy.
Web Summary : दीपिका पादुकोण, जो दूसरी बार माँ बनने वाली हैं, अल्लू अर्जुन के साथ फिल्म 'राका' के लिए एक्शन दृश्य फिल्मा रही हैं। जोखिमों के बावजूद, वह 'किंग' जैसी परियोजनाओं को पूरा करने को प्राथमिकता दे रही हैं, और टीम उनकी सुरक्षा सुनिश्चित कर रही है।