Join us

Video : “आता मी विवाहित महिला आहे, नीट बोला...”, दीपिका पादुकोणनं भर कार्यक्रमात सुनावलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 13:08 IST

Deepika Padukone : दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय...

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) एक आघाडीची अभिनेत्री. साहजिकच जगभर तिचे चाहते आहेत. सध्या दीपिका पती रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) व्हॅकेशन एन्जॉय करतेय. याचदरम्यान दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या इव्हेंटमध्ये दीपिकाची एक चाहती तिला ‘वी लव्ह यू दीपिका’ म्हणून ओरडतो आणि यावर दीपिका असं काही उत्तर देते की, सगळ्यांना हसू अनावर होतं.  वी लव्ह यू...., असं ती लेडी फॅन ओरडते. यावर ‘मी आता एक विवाहित महिला आहे. जरा नीट बोला....,’असं दीपिका मस्करीत म्हणते. तिचं हे वाक्य ऐकून सगळेच हसायला लागतात.  

दीपिकाने या इव्हेंटमध्ये पिंक कलरचा सूट घातलेला दिसतोय. या इव्हेंटमधील तिच्या ट्रॅडिशनल लुकची सुद्धा मोठी चर्चा आहे. या लुकमधील फोटो दीपिकाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.दीपिका व रणवीर सध्या अमेरिकेत आहेत. काही दिवसांआधी दोघंही शंकर महादेवन यांच्या कॉन्सर्टमध्येही पोहोचले होते. दीपिकाचे आईबाबा आणि बहिणही या इव्हेंटला हजर होते.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर  काही दिवसांपूर्वी तिचा ‘गेहराइयां’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामधील दीपिकाच्या आणि अभिनेता सिद्धांत चतुवेर्दी यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. या चित्रपटात दीपिकाने दिलेल्या बोल्ड सीन्सचीही जोरदार चर्चा झाली होती.  दीपिकाचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘फायटर’ या सिनेमातही ती झळकणार आहे. शिवाय  अभिनेता प्रभाससोबत दीपिका एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगबॉलिवूड