Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:31 IST

दीपिकाला नखरे महागात पडले, सिनेमातून झाली बाहेर

अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. तेव्हापासून दीपिकाचं आयुष्य लेकीच्याच अवतीभोवती आहे. मात्र आता ती लवकरच कमबॅकही करणार आहे. तिचे काही सिनेमांच्या शूट सुरु होणार आहे. 'कल्कि'च्या पुढच्या पार्टमध्ये ती दिसणार आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga)  यांनी 'स्पिरिट' (Spirit) सिनेमासाठी दीपिकाची निवड केली होती. मात्र आता तिच्या अवाजवी अटींमुळे त्यांनी तिला सिनेमातून बाहेर काढल्याची चर्चा आहे.

संदीप रेड्डी वांगा यांचा 'स्पिरिट' हा आगामी प्रोजेक्ट चर्चेत आहे. यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणला ऑफर देण्यात आली होती. प्रभास आणि दीपिका पुन्हा सोबत दिसणार अशा बातम्याही आल्या. मात्र आता एका तेलुगु मॅगझीनच्या रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला सिनेमातून बाहेर काढलं आहे. दीपिकाने खूव जास्त मानधन मागितल्याने संदीप रेड्डी वांगा नाराज होते. तसंच तिच्या काही अटीही होत्या. तिच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळेच वांगा यांनी तिला सिनेमातून बाहेर काढलं आहे. 

रिपोर्टनुसार, दीपिकाने दिवसाला ८ तासांप्रमाणे वर्क डे मागितला जो वास्तविक पाहता शूटिंगच्या वेळेच्या सुमारे ६ तासांच्या बरोबरचा होता. इतकंच नाही तर तिने सिनेमाच्या नफ्यात १ टक्के सहभाग आणि अवाजवी मानधनही मागितले. इथे मात्र बोलणी फिस्कटली. तसंच तिने तेलुगूमध्ये डायलॉग बोलण्यासही नकार दिल्याची चर्चा आहे. 

दीपिका पादुकोण 'स्पिरिट'सिनेमासाठी तब्बल २० कोटी मानधन घेणार अशी चर्चा रंगली होती. इतकी जास्त फीस घेणारी ती पहिलीच अभिनेत्री असती. मात्र शूटिंगबाबतीत तिचे अन्य नखरे पाहता वांगा नाराज झाले आणि त्यांनी तिलाच सिनेमातून बाहेर काढलं. आता प्रभासची 'हिरोईन' कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड