Join us

दीपवीरने अलिबागमध्ये खरेदी केला बंगला; स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च करावे लागले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 17:45 IST

Deepika-ranveer: दीपिका-रणवीरने अलिबागमधील मापगाव येथे 22 गुंठे जागा खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली असून स्टॅम्प ड्युटीसाठीदेखील त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला आहे.

ठळक मुद्देदीपवीरने अलिबागमधील मापगाव येथे 22 गुंठे जागा खरेदी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहेत. अलिकडेच या दोघांनी अलिबागच्या रजिस्ट्रेशन ऑफिसला भेट दिली होती. या दोघांनी अलिबागमधील मापगाव येथे 22 गुंठे जागा खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या प्रॉपर्टीसाठी दीपवीरला मोठी रक्कम मोजावी लागली असून स्टॅम्प ड्युटीसाठीदेखील त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला आहे.

हॉलिडेसाठी अलिबाग हे अनेकांच्या आवडीचं ठिकाण आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण विकेंडला अलिबागला जात असतात. याच अलिबागमधील मापगाव येथे दीपवीरने नुकताच एक प्रॉपर्टीचा व्यवहार केला आहे. या जोडीने मापगावात ९ हजार एकरात असलेल्या एका बंगल्याची खरेदी केली आहे.  विशेष म्हणजे २२ गुंठे असलेल्या या जागेसाठी त्यांना २२ कोटी रुपये मोजावे लागले आहेत. इतकंच नाही तर स्टॅम्प ड्युटीसाठीही त्यांना बरेच पैसे खर्च करावे लागले.

स्टॅम्प ड्युटीसाठी दीपवीरने भरली इतकी मोठी रक्कम

मापगाव येथे दीपिका-रणवीरने खरेदी केलेला बंगला प्रशस्त असून त्यात ५ बेडरुम्स आहेत. या बंगल्यासाठी त्यांनी २२ कोटी रुपये मोजले आहेत. इतकंच नाही तर केवळ स्टॅम्प ड्युटीसाठी त्यांना तब्बल १.३२ कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.

रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

दरम्यान, या नव्या बंगल्याव्यतिरिक्त दीपिका-रणवीरचं आणखी एक घर अलिबागमध्ये आहे.  हे घर त्यांनी २०१० मध्ये खरेदी केलं असून तो ४ बीएचके फ्लॅट आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगदीप- वीर