Join us

अमृतामुळे सैफने मोडलं दिलेलं वचन; दिपक तिजोरीच्या पहिल्या सिनेमात अभिनेत्रीने घातला मोडता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:47 IST

Deepak tijori: 'अमृताने सैफला माझी मदत करु दिली नाही'; दिपक तिजोरीने सांगितली कटू आठवण

बॉलिवूड अभिनेता दिपक तिजोरी (deepak tijori) सध्या त्याच्या 'टिप्पसी' या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या सिनेमाची टीम प्रमोशन करण्यात बिझी आहे. यामध्येच दिपकने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ९० च्या काळातील एक आठवण सांगितली.  ज्यात अभिनेत्री अमृता सिंहने (amrita singh) सैफ अली खानला (saif ali khan) माझी मदत करण्यापासून अडवलं होतं.

अलिकडेच दिपकने 'झूम'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने 'पहला नशा' या सिनेमाविषयी एक आठवण सांगितली. या सिनेमासाठी त्याने त्याच्या काही सेलिब्रिटी मित्रांकडे मदत मागितली होती. या सिनेमात काही कलाकारांनी कॅमियो रोल करावा अशी दिपकची इच्छा होती. विशेष म्हणजे आमिर खान(aamir khan), शाहरुख खान (shahrukh khan) आणि सैफ अली खान यांनी त्याला पहला नशामध्ये कॅमियो रोल करण्याचं वचनही दिलं होतं. मात्र, त्यानंतर अचानकपणे सैफने माघार घेतली. यामागे अमृता सिंह कारणीभूत होती.

अमृताने सैफला कॅमियो रोल करण्यापासून रोखलं

सैफ, शाहरुख आणि आमिर तिघेही मला मदत करायला तयार होते. सैफ सिनेमाच्या सेटवर येण्यासाठी घरी तयार होत होता. त्याचवेळी अमृताने त्याला रोखलं. तू काय करतोयेस? कुठे चाललास? असं विचारलं. त्यावर, त्याने या सिनेमाची माहिती दिली. त्यावर, तिने त्याला हा सिनेमा करु नये असं सांगितलं, असं दिपक म्हणाला.

सैफने ऐनवेळी दिला नकार

अमृताने त्याला रोखल्यानंतर सैफने असं कसं वागू शकतेस तू? असं विचारलं. त्यावर, आपण कोणीही हे कधीच केलेलं नाही. हे असं काम कोण करतं?जर तुला जायचं असेल तर प्रिमियरला जा आणि सपोर्ट कर फक्त. त्यानंतर सैफनेही काम करण्यास नकार दिला. या गोष्टीमुळे मला प्रचंड धक्का बसला होता.

दरम्यान,आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पहला नशा' हा दिपकचा पहिला लीड रोल असलेला सिनेमा होता. दिपक बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे. 'आशिकी', 'जो जीता वही सिकंदर', 'कभी हां कभी ना', 'बादशाह' या सिनेमात काम केलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडसैफ अली खान अमृता सिंगदीपक तिजोरीसिनेमाआमिर खानशाहरुख खान