Join us

‘ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव!’ महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर अमृता फडणवीसांनी शेअर केलं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 16:30 IST

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक जुन्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या गाण्यांची चर्चाही होते. त्यांची गाणी अनेकांच्या पसंतीसही पडतात. नुकतंच त्यांनी ‘आज मै मूड बणा ले वे’ हे पंजाबी स्टाईल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. दरम्यान, आता महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या गाण्याला नेटकऱ्यांची पसंतीही मिळत आहे. त्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात. अनेकदा राजकीय किंवा सामाजिक विषयांवरही त्या परखडपणे आपली मतं मांडत असतात.

आता त्यांनी महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा! या पवित्र दिवशी ऐका,” असं म्हणत त्यांनी आपल्या एका जुन्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी त्यांचं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी या व्हिडीओचा थोडा अंश शेअर केला आहे.

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसट्विटर