Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्याशिवाय दंगल अपूर्ण'; ऑनस्क्रीन लेकीच्या निधनामुळे आमिर खान भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 10:32 IST

Aamir khan: वयाच्या १९ व्या वर्षी सुहानीची प्राणज्योत मालवली.

'दंगल' या गाजलेल्या सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं वयाच्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. सुहानीच्या निधनामुळे बॉलिवूडसह अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत. यामध्येच सुहानीचे ऑनस्क्रीन वडील अर्थात अभिनेता आमिर खान याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

सुहानीने 'दंगल' या सिनेमात बबिता फोगाटच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या सुहानीचं अकाली निधन झाल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. सुहानीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर आमिर खानच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

काय आहे आमिरची पोस्ट?

आपल्या सुहानीच्या अशा अचानक निघून जाण्यामुळे मला प्रचंड वाईट वाटतंय. तिची आई पूजा जी आणि वडिलांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. एवढी हुशार, टॅलेंटेड मुलगी, अशी खेळाडू जिच्या निधनामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतंय. सुहानीशिवाय दंगल सिनेमा अपूर्ण राहिला असता. सुहानी, तू कायम आमच्या मनात एक स्टार म्हणूनच राहशील, अशी पोस्ट आमिर खानच्या टीमने केली आहे.

दरम्यान, सुहानीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. मात्र, त्यापूर्वीच तिचं निधन झालं. एका दुर्मिळ आजारामुळे तिचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये ती जखमी झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या शरीरावर सूज वाढत गेली. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला, मात्र अचूक निदान होईना. सुमारे दोन महिने तिच्या अंगावर सूज होती. यामध्येच तिच्या शरीरात पाणी झालं होतं. 

टॅग्स :बॉलिवूडआमिर खानसेलिब्रिटीसिनेमा