Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, फर्स्ट लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 08:29 IST

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर यावरुन आता पडदा हटविण्यात आला आहे. 

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे. विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर यावरुन आता पडदा हटविण्यात आला आहे. 

'छावा'मध्ये आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात बॉलिवूड अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याच्या लूकचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा खूंखार अवतार पाहायला मिळत आहे. पांढरी दाढी, केस आणि डोक्यावर शाही मुकुट असा लूक दिसत आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणारा हा अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना आहे. "डर और दहशत का नया चेहरा- मुघल शेहनशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना", असं कॅप्शन देत हे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'छावा' सिनेमाचं नवं मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं. आज (२२ जानेवारी) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. छावा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :विकी कौशलसिनेमाअक्षय खन्ना