Join us

रग रग में तुफान! छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित 'छावा'मधील दुसरं गाणं; ए. आर. रहमान यांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:30 IST

Aya re Toofan song: 'छावा' सिनेमातील ए.आर.रहमान यांच्या बुलंद आवाजातील तुफान गाणं भेटीला आलंय. बातमीवर क्लिक करुन बघा (chhaava movie)

काहीच दिवसांपूर्वी 'छावा'  (chhaava) सिनेमातील पहिलं गाणं 'जाने तू' (jaane tu) रिलीज झालं. या गाण्यात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंमधलं नातं बघायला मिळालं. हे गाणं सध्या गाजत असतानाच 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला समर्पित असं 'आया रे तुफान' हे दुसरं गाणं भेटीला आलंय. अंगावर शहारा आणणारं हे गाणं आणि या गाण्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

छावामधील दुसरं गाणं भेटीला

'छावा'मधील दुसऱ्या गाण्यात सुरुवातीला बघायला मिळतं की शंभूराजे शंकराच्या पिंडीला अभिषेत करताना दिसत आहेत. पुढे संभाजी महाराज रायगडाला येतात तो प्रसंग पाहायला मिळतो. त्यानंतर राज्याभिषेक प्रसंगाच्या वेळी आबासाहेबांच्या सिंहासनावर बसताना शंभूराजांना झालेली जबाबदारीची जाणीव दिसते. शेवटी शंभूराजांभोवती पडलेला मुघलांचा वेढा दिसतो. असंख्य शत्रूंशी वाघासारखे लढणारे छत्रपती संभाजी महाराज बघायला मिळतात. गाण्याच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा जबडा फाडतानाचं दृश्य बघून अंगावर काटा उभा राहतो.

ए.आर.रहमान यांचा आवाज

'छावा'मधील 'आया रे तुफान' गाण्याला ए. आर. रहमान यांचा बुलंद आवाज दिसतो. 'भगवे की शान से चमका आसमान', अशा सुंदर शब्दांनी 'आया रे तुफान' गाणं सजलेलं दिसतं. इर्शाद कामिल, क्षितीज या दोघांनी 'आया रे तुफान' गाण्याचे शब्द लिहिले असून ए. आर. रहमान यांनीच या गाण्याला संगीत दिलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्नाए. आर. रहमान