Join us

'मंडे टेस्ट'मध्ये 'छावा'ची कमाई वाढली की घटली? रिलीजनंतर ११ व्या दिवशी सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:18 IST

Chhaava Box Office Collection: 'छावा' सिनेमाची कमाई वाढली की कमी झाली? जाणून घ्या ११ व्या दिवसाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. विकी कौशलने सिनेमात (vicky kaushal) साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय सिनेमात संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, शुभंकर एकबोटे हे मराठी कलाकारही पाहायला मिळत आहेत. 'छावा' सिनेमातील सर्वांच्याच भूमिकेचं चांगलं कौतुक झालं. 'छावा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलीय. काल सोमवारी मंडे टेस्टमध्ये 'छावा' सिनेमाने किती कमाई केलीय, जाणून घ्या.'छावा' सिनेमाने सोमवारी किती कमाई केली?

बॉलिवू़ड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'छावा' सिनेमाने रविवारी १५-२० कोटींची कमाई केलीय. परंतु दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी 'छावा'च्या कमाईत चांगलीच घट झाल्याचं दिसतंय. रिलीजच्या ११ व्या दिवशी अर्थात सोमवारी 'छावा' सिनेमाच्या कमाईत घट झालेली दिसली. ११ व्या दिवशी 'छावा' सिनेमाने १० कोटींची कमाई केली. याशिवाय जगभरातील कमाईचा उल्लेख करता 'छावा' सिनेमाने ४९०-४९५ कोटींची कमाई केलीय. एकूणच 'छावा' सिनेमाची हवा ओसरलेली पाहायला मिळतेय.

'छावा' सिनेमाबद्दल

'छावा' सिनेमाविषयी सांगायचं तर, या सिनेमात विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय इतर ऐतिहासिक भूमिकांमध्ये आशुतोष राणा,  प्रदीप रावत, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, किरण करमरकर हे कलाकार दिसत आहेत. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच 'छावा' सिनेमाची खूप चर्चा आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात 'छावा' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये हाउसफुल्ल गर्दी होत आहे.

 

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाअक्षय खन्नाबॉक्स ऑफिस कलेक्शन