Join us
Daily Top 2Weekly Top 5

Chhaava: प्रेक्षकांच्या मनातच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य! 'छावा'ने दोन दिवसांत किती कमावले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 08:51 IST

बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं दोन दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा'छावा' हा ऐतिहासिक सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. बहुचर्चित आणि बिग बजेट असलेल्या 'छावा' सिनेमाने प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. आता सिनेमाचं दोन दिवसांचं कलेक्शन समोर आलं आहे. 

'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रदर्शनाआधीच सिनेमाचे शो सर्वत्र हाऊसफूल होते. विकी कौशलच्या या सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशीच तब्बल ३१ कोटींचा गल्ला जमवला होता. तर आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या शनिवारी सिनेमाने ३६.५ कोटींची कमाई केली आहे. रविवारी सिनेमाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. तर पहिल्या विकेंडला 'छावा' सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करण्याचा अंदाज वर्तविला आहे. 

'छावा'ने बॉलिवूडला २०२५ वर्षाची दमदार सुरुवात करून दिली आहे. १३० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने दोनच दिवसांत ६७.५ कोटी कमावले आहेत. 'छावा'मध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलरश्मिका मंदानाबॉक्स ऑफिस कलेक्शन