Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्रीचा १५ वर्षांचा संसार मोडला; ऑस्ट्रेलियन पतीवर केले घरगुती हिंसाचार आणि शारीरिक छळाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:48 IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असून तिचा १५ वर्षांचा सुखी संसार मोडला आहे. १५ वर्षांच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे.

'नो एन्ट्री' आणि 'गोलमाल रिटर्न्स' फेम अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत आपल्या १५ वर्षांच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे.

लग्नाच्या १५ व्या वाढदिवशीच मिळालेली घटस्फोटाची नोटीस

सेलिनाने उघड केले की, ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिच्या पतीने तिला आश्चर्याचा धक्का देण्याच्या बहाण्याने एका स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये नेले. तिथे तिला 'भेटवस्तू' ऐवजी घटस्फोटाची नोटीस हातात देण्यात आली. तिने सांगितले की, "सप्टेंबरच्या सुरुवातीला मला ही नोटीस मिळाली आणि त्या एका क्षणात माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले."

सेलिनाने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, ती अनेक वर्षांपासून हे सर्व सहन करत होती. केवळ आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी तिने गप्प राहणे पसंत केले होते. तिने मुंबईच्या अंधेरी न्यायालयात ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पीटरने तिला कामापासून रोखले आणि तिला आर्थिकदृष्ट्या परावलंबी बनवले.

घटस्फोटाच्या या प्रक्रियेत सेलिनाला सर्वात जास्त दुःख तिच्या तीन मुलांपासून (विन्स्टन, विराज आणि आर्थर) दूर राहावे लागत असल्यामुळे होत आहे. तिने असा दावा केला आहे की, ऑस्ट्रियन कोर्टाचे आदेश असूनही तिला तिच्या मुलांशी संवाद साधू दिला जात नाहीये. मुलांचे 'ब्रेनवॉशिंग' केले जात असून त्यांना आईच्या विरोधात भडकवले जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.

सेलिना म्हणाली, "मी या काळात शिकले की तुम्ही एखाद्यावर कितीही जास्त प्रेम केले तरी तुम्ही त्याला बदलू शकत नाही. जे आधीच तुटले आहे, त्या नात्याला प्रेमाच्या माध्यमातून पुन्हा जोडू शकत नाही." तिने पुढे असेही सांगितले की, ती जेव्हा काही बोलू शकत नव्हती, तेव्हा ती लिहिण्याचा आधार घ्यायची. तिची ही पत्रे तिच्यावरील अत्याचाराचा आणि संघर्षाचा पुरावा आहेत. सध्या सेलिना भारतात असून आपल्या हक्कांसाठी आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढा देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Celina Jaitly alleges domestic violence, divorce after 15-year marriage.

Web Summary : Actress Celina Jaitly revealed her divorce after 15 years, alleging domestic violence and abuse by her Austrian husband. She filed a 50 crore lawsuit, claiming he restricted her career and finances. She is fighting for custody of her children, alleging alienation and brainwashing.
टॅग्स :सेलिना जेटलीबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार