Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत हे सेलिब्रेटी, तरी नाही नाद व्यसनाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 15:56 IST

कोटींच्या संपत्तीचे मालक असतानाही हे कलाकार व्यसनासारख्या घातक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात.

आजकाल व्यसन हे फॅड म्हणून केले जाते. कुणी क्रेझ म्हणून करतं तर कुणी पैसा आहे म्हणून मोठेपणा करण्यासाठी व्यसनाच्या आहारी जातात. मात्र हे करताना त्यांना हे शरीरासाठी किती घातक आहे, हे विसरून जातात. मात्र असे काही कलाकार आहेत ज्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. हे कलाकार कोटींच्या संपत्तीचे मालक असतानाही व्यसनासारख्या घातक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा फिटनेस  फ्रिक आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कधीच दारू सिगारेट पित नाही. तो त्याच्या फिटनेससाठी इतका शिस्तप्रिय आहे की तो दररोज सकाळी चार वाजता उठून व्यायाम करतो व दररोज रात्री नऊ वाजताच झोपतो.

अमिताभ बच्चन

अमिताभ यांनी त्यांच्या कारकीर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामधून त्यांनी चांगलीच जमापुंजी जमवली आहे.एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांच्याकडे सध्या २८३८ करोडो रुपयांची संपत्ती आहे. १९८४ मध्ये आलेला शराबी हा अमिताभ यांचा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ यांनी एका दारूड्याची भूमिका निभावली होती. त्यांनी ही भूमिका इतकी समरसून केली होती की प्रेक्षकांना अगदी ते खरेखुरे दारुडे वाटले होते. परंतु वैयक्तिक आयुष्यात मात्र अमिताभ दारू सिगारेट यांसारख्या पदार्थांपासून दूर आहेत.

जॉन अब्राहम –  

२००७ मध्ये जेव्हा जॉन नो स्मोकिंग या चित्रपटाचे शूटिंग करत होता. तेव्हा चित्रपटाच्या गरजेसाठी व भूमिका नीट निभावण्यासाठी त्याला दिवसाला नव्वद सिगरेट ओढाव्या लागल्या होत्या. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर जेव्हा जॉनने त्याच्या छातीचा एक्स-रे काढून घेतला. तेव्हा त्याला माहित पडले की अतिप्रमाणात सिगरेट ओढल्यामुळे त्याची फुप्फुसे पूर्णपणे काळी पडली आहेत. त्यानंतर मात्र स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कधीही सिगरेट व दारुला हात लावला नाही.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी हे तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी शिल्पा नेहमी योगा व डाएटचा अवलंब करते. मसालेदार पदार्थांसोबत असं शिल्पा दारू सिगारेट यांसारख्या गोष्टींपासून देखील दूर राहणे पसंत करते.

दीपिका पदुकोण –

दीपिकाचे नाव आता टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. शिवाय तिचे नाव श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत देखील समाविष्ट आहे. दीपिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. दीपिकादेखील अमली पदार्थांपासून चार हात लांब आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअक्षय कुमारजॉन अब्राहमदीपिका पादुकोणशिल्पा शेट्टी